या एवढ्या मोठ्या शहरात
कुठेतरी राहतो एक कवी,
तो राहतो असा जणू विहिरीत
राहते शांतता,
जसे शांततेत राहतात शब्द,
शब्दांमध्ये असतो पंखांचा
फडफडाट,
तो राहतो एवढ्या मोठ्या
शहरात
आणि कधीच काही बोलत नाही...
फक्त कधी-कधी
विनाकारण
तो होतो अस्वस्थ
पुन्हा उठतो
बाहेर पडतो
कुठून तरी शोधून आणतो एखादा
खडू
सामोरच्या स्वच्छ चमकदार
भिंतीवर
लिहितो ‘क’...
एक छोटासा
साधासा ‘क’
खूप वेळ गुंजत राहतो
संपूर्ण शहरात...
‘क’ म्हणजे काय?
एका म्हातारीने एका
शिपायाला विचारलं,
शिपायाने विचारलं
अध्यापकाला,
अध्यापकाने विचारलं
वर्गातल्या सर्वात शांत
विद्यार्थ्याला...
‘क’ म्हणजे काय?
साऱ्या शहराने विचारलं...
आणि एवढ्या मोठ्या शहरात
कुणालाही नाही माहित
की तो जो कवी आहे
जो प्रत्येकवेळी उंचावतो
हात
जो स्वच्छ चमकत्या भिंतीवर
लिहितो ‘क’
त्याची केली जाते हत्या...
फक्त एवढंच सत्य आहे की
बाकी सर्व ध्वनी आहेत,
अलंकार आहेत,
रस-भेद आहेत,
मला त्याच्याबद्दल यापेक्षा
अधिक
काहीच माहित नाही
मला खंत आहे...
मूळ कविता : महानगर में कवी
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा