देहाची पणती जळत आहे,
प्रीतीचे त्यात स्निग्ध आहे,
स्नेहाची त्यात वाट आहे,
आत्म्याची तेवणारी ज्योत आहे...
या पणतीने आयुष्याचं वादळ झेललंय,
पावसाच्या सरींना अन्
वाऱ्याच्या लहरींना पेललंय,
तरीही तिच्या ध्येयासाठी
ती जळत आहे.
जगात अंधार दशदिशांनी दाटलाय,
दुःख, वेदना, यातना या नावांनी व्यापलाय,
त्याला दूर करण्यासाठी
ती अजूनही जळत आहे...
साऱ्या जगाला प्रकाशमान करीत,
नव्या प्रगतीची नवी वाट दाखवत,
आत्मदहनाचा मार्ग पत्करून
ती आदर्श ठरत आहे.
साऱ्या दुनियेच्या भल्यासाठी
ती सहन करीत आहे,
त्या तिमिरहारी तेजोमय ज्योतीचा दाह,
समाजाची उपेक्षा आणि यशाची प्रतीक्षा,
तरीही ती तेवत आहे,
देहाची पणती अजूनही जळत आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा