अंधार ! अंधार ! अंधार !
ऐकू येतात
कानामधे
तरीही काही आवाज...
दूर खूप दूर
कुठेतरी
भीषण शांततेत
राहून राहून
विटांवर
विटा ठेवण्याचे
फळांच्या पिकण्याचे
बातम्यांच्या छापण्याचे
निद्रिस्त तुतींवर
रेशीमकिड्यांच्या
जागण्याचे
विणण्याचे...
आणि मला जाणवतं
जोडला गेलोय मी
या अनिद्र आवाजांपासून
हरवलेल्या इतिहासाच्या
अगणित धृवांपर्यंत...
मी अजूनही लिहिण्यात मग्न
आहे
झुकवून मान अनेक तास
या कोऱ्या कागदाच्या
भट्टीवर
लगातार
अंधार ! अंधार ! अंधार !
मूळ कविता : रचना की आधी रात
मूळ कवी :
केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा