शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०१४

अपरिचित...



मी परततो


बनून अपरिचित


स्वतःसाठीच.





भयभीत झालेला असतो माझा आत्मा,


इच्छा धास्तावलेल्या,


स्वप्न भंगलेली,


आणि अभिलाषा


ज्याच्या अग्नीत स्वाहा झालेल्या,


कोण आहे तो?





मी ज्याच्या शोधार्थ निघतो


आणि स्वतःसाठीच अपरिचित

होऊन परततो.


मूळ कविता : Stranger

कवी : गुलझार

मूळ भाषा : इंग्रजी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा