शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

उदाहरणादाखल...

पूर्वी,
हिंस्रतेच्या प्रत्येक उदाहरणादाखल
उभे राहत
अनेक प्राणी,
वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता...
त्यांची नखे,
त्यांचे सुळे,
त्यांनी केलेली शिकार,
एखाद्या निष्पाप प्राण्याचा
गेलेला जीव,
अन् सारवासारव निसर्गनियमांची...

आणि आज,
हिंस्रतेच्या प्रत्येक उदाहरणादाखल
उभे राहतात
अनेक घटक,
वृत्ती, प्रवृत्ती, विकृती,
त्यांचे प्रकार,
त्यांची कारणं,
त्यांचे परिणाम,
एखाद्या निष्पाप जीवाचं
आक्रंदणारं मन
अन् पुन्हा सारवासारव अपवादांची...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा