मंगळवार, १२ ऑगस्ट, २०१४

स्वातंत्र्य 1...

स्वातंत्र्य हे कंच्या गाढवीचं नाव आहे?
खरंचं स्वातंत्र्य हे कंच्या गाढवीचं नाव आहे?
ढसाळ तुम्ही बरोबर होतात,
बरोबर आहात.
स्वातंत्र्य नावाची चीजच नाही,
कडकडून पेटणारी मनामनात वीजच नाही...
इथे अभिव्यक्तीला प्रतिष्ठेचे डंख आहेत,
इथल्या स्वाभिमानाला स्वार्थाचे पंख आहेत...
खरंचं स्वातंत्र्य हे कंच्या गाढवीचं नाव आहे?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा