शुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

          आज १ ऑगस्ट, लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. शाळा, महाविद्यालये, शासकीय यंत्रणा यांनी आज टिळकांची पुण्यतिथी साजरी केली असेलही आणि आपणही त्यांचा भाग झालो असू. पण आपल्यापैकी किती जणांना माहित आहे की आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. शासनयंत्रणेसारखेच आपणही निबर झालेलो असतो आणि अण्णाभाऊंसारख्या अनेक थोर मात्र उपेक्षित व्यक्ती आपल्या स्मरणातदेखील राहत नाहीत. म्हणूनच अण्णाभाऊंच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा आणि आदरांजलीही...
कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील लेखन करणारे ख्यातनाम मराठी साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी ब्रिटीश वाटेगाव तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे राज्यकर्त्यांनी गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सिधोजी तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मुळनाव तुकाराम असे होते. त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते. तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळवले.
१९३२मध्ये वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोर्बग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी अशी मिळतील ती कामं त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमयदुःखाचे जीवन त्यांनी पाहिलेत्यांचे संपमोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला१९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉश्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झालेमुंबईत डॉबाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकलीपक्षाचे कामही ते करीत होतेच;तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आलेतेथे बापूसाठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागलेपुढे १९४२ च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकडवॉरंटकाढलेपोलिसांना चुकवीत ते मुंबईला आलेमुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झालात्यावेळी अमरशेख  या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागलेत्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी   या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमरशेख आणि शाहीर गवाणकर यांच्या मदतीने लाल बावटा कलापथक स्थापन केले. अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होतेत्यांच्या शाहिरीत लावणीपोवाडेगीतेलोकनाटये आदींचा समावेश होता.‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिलात्याचप्रमाणे मुंबई कुणाची ? ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोगकेलेअकलेची  गोष्ट  (१९४५), देशभक्त घोटाळे  (१९४६),  शेटजींचे  इलेक्शन  (१९४६), बेकायदेशीर  (१९४७), पुढारी  मिळाला  (१९५२),लोकमंत्र्यांचा दौरा  (१९५२ही त्यांची अन्य काही लोकनाटयेअण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले

अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरतेजिवंत काडतूसआबीखुळंवाडीबरबाद्याकंजारी   (१९६०), चिरानगरची   भुतं   (१९७८), कृष्णाकाठच्या कथा  हे त्यांचे काही कथासंग्रहत्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्याचित्रा  (१९४५हीत्यांची पहिली कादंबरीत्यानंतर ३४ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्यात्यांत फकिरा  (१९५९आवृ.१६,१९९५), वारणेचा वाघ  (१९६८), चिखलातीलकमळरानगंगामाकडीचा माळ  (१९६३), वैजयंता  ह्यांसारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतोत्यांच्या फकिरा  ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचापुरस्कार मिळालावास्तवआदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहेसत्प्रवृत्तीचामाणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्यसूत्र होयत्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले वैजयंता  (१९६१कादंबरी वैजयंता ), टिळा लावते मी रक्ताचा  (१९६९कादंबरी आवडी  ),डोंगरची मैना,(१९६९कादंबरी माकडीचा माळ ), मुरली मल्हारीरायाची  (१९६९कादंबरी चिखलातील कमळ ), वारणेचावाघ(१९७०कादंबरीवारणेचा वाघ ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा  (१९७४कादंबरी अलगूज ), फकिरा  (कादंबरी फकिरा ). या शिवायव इनामदार  (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान  ही नाटकेही त्यांनी लिहिली

उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेलेदलित आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आलेडॉबाबासाहेब आंबेडकरयांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. ‘जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥’ हे त्यांचे गीतखूप गाजलेत्यांनी लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’ आणि ‘मुंबईची लावणी’ या अजोड आणि अविस्मरणीय आहेत

अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती.‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे’, असे ते म्हणत;आणि हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणा स्रोत होतामानवी जीवनातील संघर्षनाटयदुःखदारिद्र्य त्यांच्या साहित्यातून प्रकट होतेत्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून त्यांनी उभ्या केलेल्या माणसांत जबरदस्त जीवनेच्छा दिसतेत्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माणझालीत्यात बाबूराव बागूलनामदेव ढसाळलक्ष्मण मानेयशवंत मनोहरदया पवारकेशव मेश्रामशरणकुमार लिंबाळे आदींचा अंतर्भाव होतो

अण्णाभाऊंची निरीक्षणशक्ती अत्यंत सूक्ष्म आहेत्यांच्या लेखन शैलीला मराठमोळारांगडा पण लोभस घाट आहेनाट्यमयता हाही त्यांच्यालेखनशैलीचा एक खास गुणज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केलेत्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनातजाणवतोलवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहेलेखनावर त्यांनी जीव जडवला होतात्यांनी ते विपुलकेले.  

रशियाच्या ‘इंडोसोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली रशियाला गेलेतेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचाप्रवास  हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले
दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य उत्तरकाळात प्रकर्षाने त्यांच्या वाट्याला आले. मराठी साहित्यातील प्रतिष्ठितांकडून त्यांची उपेक्षा झाली.विपन्नावस्थेत गोरेगाव (मुंबईयेथे त्यांचे १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले.

महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध सिद्घ केले गेले आहेतपुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरुकरण्यात आले आहेत्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हेतर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.

संदर्भ गुरवबाबुरावअण्णाभाऊ साठे : समाजविचार आणि साहित्य विवेचनमुंबई१९९९.  
 महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळप्रकाशकलोकशाहीर अण्णाभाऊ साठे : निवडक वाङ्‌मयमुंबई







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा