स्वच्छ स्पष्ट दृश्य
पूर्णतः स्पष्ट
तर
कधी कधी
स्वप्नांशी भिडतं.
शोधाशोध करणारं
माझं मन
काही अंतरावरील भूतकाळात
काही दीर्घ धूसर शोध घेतं.
ते प्रश्न
ज्यांची उत्तर मिळत नाहीत
गाडून टाका त्यांना
गुपचूप
म्हणजे ते पुन्हा
डोकं काढून
उभे नाही नाही ठाकणार
माझ्या शोधकर्त्या
मनासमोर....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा