सोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४

चित्र...




कागदावर उतरणारं
तुझं चित्र
मी रेखाटते,
खोडून टाकते,
रंग पसरतात,
डाग बनतात,
आणि कुंचला तोडून
मी
बसून राहते गुपचूप....
पुन्हा शोधते
नव्या रंगांना,
नव्या रेषांना जोडते
पुन्हा नव्याने
नव्या कुंचल्याने
पण त्यांच्या ओंजळीत
रंगत जातो एक अवकाश
कारण
आधी रंग पसरलेच होते

काही अशाप्रकारे.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा