सरकार कसंही असो
कसा ही असो राजा
खऱ्या कवीचं जगणं कठीण होतंच.
गातो जेव्हा तो स्वातंत्र्याचं गाणं
भरावं लागतं त्याला मोल
आपल्या स्वातंत्र्यानं.
प्रत्येक हुकुमशहाच्या साम्राज्यात
कवीच देतो शब्द
प्रताडीत जनतेच्या कष्टांना.
जेव्हा स्वातंत्र्याचं राज्य असतं
सैतान तांडव करत असतो
करत असतो हत्या
स्वातंत्र्याची स्वातंत्र्याने.
नाही ऐकू येत याच कारणाने
खऱ्या कवीचा आवाज
स्वातंत्र्याच्या काळात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा