सोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४

ओळख...



तू स्पर्श करतोस,
वेदना होतात.

लावतोस जेव्हा
तू मलम
व्रणांवर माझ्या,

मी
तुला ओळखत नाही
पण माझ्या व्रणांना
तुझ्या बोटांची ओळख आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा