सोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४

कुरुक्षेत्र...



मी नाही जन्मले
सूर्याकडून
कवचकुंडले घेऊन
माझ्यासोबत आहे
पिता स्वयं सत्य
जो कोणतेही युद्ध
जिंकण्यास सक्षम आहे.
मी नाही करत प्रयोग
त्या रथाचा
ज्याचा सारथी कृष्ण असेल
आणि नाही उचलत गांडीव
त्यांच्या कूटनीतीने प्रेरित होऊन
मी तर स्वयंसिद्ध साधक आहे
माझी साधनाच बनवते मला
कर्मक्षेत्रातील वीरांगना...
माझ्याकडे नाहीये
द्रोणांची विद्या
पितामहांचे आशीर्वाद
आणि मी काही
एकलव्याचा पुनर्जन्मही नाही,
माझ्याकडे आहेत
माझे दोन हात
जे संघर्षातून सुलाखून बनले आहेत
पोलाद
जे करू शकतात
कोणत्याही अन्यायाचा प्रतिकार...
मला नाही मिळालं
अंध गांधारीचं वरदान
महाराणी कुंतीच्या तपस्येचं फळ
परंतु माझ्याकडे आहे
माझ्या निष्कपट आईचे पवित्र दुध
जे बनवतं कोणत्याही विषाला अमृत
आणि मी जिंकत जाते

एक एक कुरुक्षेत्र...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा