गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

उपहास...

मी वाचते थोडंफार
आणि त्यासाठी जाते
फार फार दूर
वाचनालयात.

अनेकजण तिथे अनेक गोष्टी
वाचत असतात,
पण
वेद वाचणारे फुले वाचत नाहीत,
फुले वाचणारे रानडे वाचत नाहीत,
रानडे वाचणारे शाहू वाचत नाहीत...

वाचणारे वाचत राहतात
आपापल्या नजरेतून,
वाचतात जे टिळक
ते आंबेडकर वाचत नाहीत,
आंबेडकर वाचणारे
सावरकर वाचत नाहीत,
आणि याहून मोठ्ठ दुर्दैव म्हणजे
या साऱ्यांची नावं घेणारे
यांपैकी काहीच वाचत नाहीत.

थोडक्यात काय,
अशा या सावळ्या गोंधळातून
आता आपला देश काही

वाचत नाही....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा