शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०१४

लोहपुरूष : सरदार वल्लभभाई पटेल


वल्लभभाई जव्हेरभाई पटेल
(३१ ऑक्टोबर १८७५-१५ डिसेंबर १९५०).
भारतीय स्वातंत्र्य-आंदोलनातील एक ज्येष्ठ नेते व स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान. जन्म लेवा पाटीदार शेतकरी कुटुंबात करमसद (खेडा जिल्हा) येथे. त्यांच्या आईचे नाव लाडबाई. विद्यार्थिदशेतच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभी करून एका कठोर शिक्षकाविरुद्ध तीन दिवसांचा यशस्वी संप घडवून आणला. प्राथमिक शिक्षण करमसद येथे घेऊन पुढील सिक्षण त्यांनी पेटलाड, बडोदा व नडियाद येथे घेतले. विद्यार्थिदशेतच जव्हेरबाई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). १८९७ साली नडियादहून ते मॅट्रिक झाले. घरच्या गरिबीमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. ते त्यावेळची वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. वकिलीत पैसे मिळवून बॅरिस्टर होण्याची त्यांना जबरदस्त महत्त्वाकांक्षा होती. ते मुख्यतः फौजदारी खटले गोध्रा येथे चालवीत. वकिलीत त्यांना पैसा व प्रतिष्ठा दोहोंचा लाभ झाला. त्यांनी इंग्लंडला जाण्याकरिता १०,००० रु.जमविले आणि पारपत्रही काढले; परंतु आद्याक्षरातील सारखेपणाचा फायदा घेऊन त्यांचे वडीलबंधू विठ्ठलभाई बॅरिस्टर होण्यासाठी १९०५ मध्ये इंग्लंडला गेले. वल्लभभाईनी त्यांना संमती तर दिलीच; पण आपले पैसे व कपडे दिले व त्यांचा प्रपंचही चालविला. वल्लभभाईच्या प त्नी १९०९ सा ली बारल्या. पुढील वर्पी ते बॅरिस्टर हो ण्या सा ठी इंग्लंडला गेले. या प री क्षे त त्यांचा पहिला क्रमांक आला व ५० पौडांचे पारितोषिक त्यांना मिळाले १९१३ साली ते परत आले व अहमदाबादला त्यांनी वकिली सुरू केली. प्रारंभी ते लोकमान्य टिळकांच्या जहाल पक्षात सामील झाले. त्यांचे प्रारंभीचे जीवन काहीसे विलासी व चैनीचे होते. क्लब, पत्ते खेळणे यांत ते उरलेला वेळ घालवीत. महात्मा गांधी अहमदाबादला येईपर्यं त्यांची ही दिनचर्या चालू होती; पण गांधीच्या सहवासाने ते पूर्णतः वदलले (१९१७). महात्मा गांधी गुजरात सभेचे अध्यक्ष व वल्लभभाई चिटणीस झाले. त्यांनी १९१७-१८ सालच्या खेडा सत्याग्रहात हिरिरीने भाग घेतला आणि तो यशस्वी करून दाखविला. अहमदाबाद नगरपारिकेत ते याच वर्षी निवडून आले. पुढे तर १९२४-२८ दरम्यान ते नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यांनी अनेक सुधारणा करून अहमदाबाद शहर स्वच्छ व सुंदर केले. त्यांनी केलेल्या सुधारणांत जलनिकास व्यवस्था व पाणीपुरवठा योजना या दोन महत्त्वाच्या होत. त्या वेळी गुजरातमध्ये वेठबिगार पद्धती होती. त्यांनी प्रयत्न करून ती पद्धत बरीच मर्यादित केली. रौलट कायद्याचे वेळी त्यांनी आक्षिप्त राष्ट्रीय साहित्य विकले व सार्वजनिक निदर्शनांत भाग घेतला. गांधींच्या असहकारितेत्या चळवळीत वल्लभभाई आघाडीवर होते. त्यांनी सुखासीन राहणीमानाचा त्याग केला व तत्काल वकिली सोडली. या सुमारास कु. दहा लाखांचा निधी गोळा करून गुजरात विद्यापीठाची स्थापना केली (१९२०). १९२१ साली ते गुजरात प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि लवकरच अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष बनले. १९२३ सालच्या नागपूर झेंडा सत्याग्रहात त्यांच्याकडे नेतृत्व होते. त्यांनी तो सत्याग्रह यशस्वी केला. याच सालच्या बोरसद सत्याग्रहातही ते यशस्वी झाले. १९२७ साली ते नगरपारिकेचे अध्यक्ष असताना गुजरातमध्ये जलप्रलय़ झाला. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या कामी त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे. १९२८ च्या फेब्रुवरीत बार्डोलीला करबंदीची चळवळ जोरात सुरू झाली. त्या लढ्याची संपूर्ण योजना वल्लभभाईंची होती. फेब्रुवारी १९२८ ते ऑक्टोबर १९२८ पर्यंत हा लढा चालू होता. त्यात त्यांनी घवघवीत यश मिळविले. त्यांचे नाव सर्व भारतभर दुमदुमू लागले व याच वेळी सरदार ही उपाधी त्यांना प्राप्त झाली. १९३० साली मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाषणबंदीचा हुकूम मोडला आणि रास गावी भाषण केले. त्यामुळे त्यांना सिक्षा व तुरुंगवास भोगावा लागला. यानंतर त्यांना ३ महिने, ९ महिने असा आणखी शिक्षा झाल्या. सरदारांचे कर्तृत्व व काँग्रेसमधील कार्य यांचा विचार करून त्यांना कराची काँग्रेसचे अध्यक्षस्थान देण्यात आले (१९३१). गांधींबरोबरच त्यांनाही १९३२ मध्ये अटक झाली व येरवड्यास स्थानबद्ध करण्यात आले. त्यांना जुले १९३४ मध्ये सोडण्यात आले. पुढे बिहारच्या भूकंपाच्या वेळी काँग्रेसचे विधिमंडळ प्रवेशविषयक धोरण बदलले. त्या साली पार्लमेंटरी बोर्ड स्थापन झाले आणि सरदार त्याच्या उपसमितीचे अध्यक्ष झाले. १९३६ साली पुन्हा त्यांना प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणूक मंडळाचे अध्यक्ष केले. सरदारांची ती कामगिरी अत्यंत मोलाची होती. १९३८ च्या हरिपूर काँग्रेसचे ते स्वागताध्यक्ष आणि सुभाषबाबू अध्यक्ष होते. त्याच साली राजकोटच्या महाराजांवरोवर संस्थानी प्रजेतर्फे त्यांनी तडजोड केली; पण महाराजांनी ती तडजोड अमान्य केली. सरदारांनी कायदेभंग सुरू केला. त्याच कारणाने गांधींना ३ ते ७ मार्च १९३९ दरम्यान उपवास करावा लागला. १९४० च्या नोव्हेंबरमध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना स्थानबद्द करण्यात आले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी छोडो भारतचा ठराव संमत होण्यापूर्वीच सरदारांनी गुजरात पटेवला होता. ९ ऑगस्टला त्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात इतर काँग्रेसच्या नेत्यांबोबर अटकेत ठेवले. १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका झाली.

सुटकेनंतर सिमला परिषद, कॅबिनेट मिशन वगैरेंत त्यांनी भाग घेतला. त्यांच्या मध्यस्थीने मुंबईच्या नाविक बंडाला (१९४६) आळा घातला गेला. २ सप्टेंबर १९४६ रोजी हंगामी मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून ते समाविष्ट झाले. घटनापरिषदेचे ते सभासद होतेच. त्यांनी सुरुवातीस कम्युनिस्टांची बंडे निपटून काढली; पण सरदारांचे सर्वांत मोठे, महत्त्वाचे व राष्ट्रीय ऐक्याचे काम म्हणजे संस्थानांच्या वलीनीकरणा चे काम होय. त्यांनी हैदराबाद, जुनागठ व काश्मीर सोडून इतर सु. ५५० संस्थाने भारतात विलीन केली. पुढे त्यांनी हैदराबाद संस्थानही, पोलीस कारवाई करून खालसा केले. या विलीनीकरणाच्या कार्यात त्यांना व्ही. पी. मेनन यांचे बहुमोल साहाय्य झाले. प्रसिद्ध सोरटी सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी व व्यवस्थेसाठी त्यांनी एक विश्वस्त निधी उभा केला. अस्पृश्यांना त्या देवळात प्रवेश व पूजा करण्याचा हक्क विश्वस्त पत्रकात वल्लभभाईंनी नमूद केला; तसेच सर्व धर्माच्या व्यक्तींना खुल्या प्रवेशाची तरतुदही त्यात नमूद केली. ही त्यांची इच्छा पुढे १९५१ मध्ये पुरी झाली. महात्मा गांधीचा ३० जानेवरी १९४७ रोजी खून झाला. आपण गृहमंद्री असताना ही घटना घडावी, यामुळे ते अत्यंत उद्विग्न झाले. यानंतर काही दिवसांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती हळूहळू खालावत गेली. ३१ ऑक्टेबर १९४८ रोजी मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी इत्नजडित सोन्याचा अशोकस्तंभ आणि चांदीची मोठी प्रतिमा त्यांना अर्पण करण्यात आली. त्यांना नागपूर, प्रयाग, उस्मानिया यांसारख्या अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली, त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त १९५० साली अहमदाबाद शररातर्फे त्यांना पंधरा लाख रुपयांची थैली अर्पण केली. त्यानंतर सरदारांची प्रकृती अधिक क्षीण झाली. हवा पालटण्यासाठी ते १२३ डिसेंबरला मुंबईस आले. तेथेच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने अंत झाला. त्यांच्या मुलाचे नाव डाह्याभाई व मुलीचे मणिबेन.

भारतीय स्वातंत्र्यालढ्यात आणि त्यानंतरच्या स्वातंत्र्योत्तर भारतात वल्लभभाईंना मानाचे स्थान आहे. एकात्म भारताचे ते खरे शिल्पकार असून काँग्रेसच्या पक्ष संघटनात्मक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. भारताचा पोलादी पुरुष म्हणून त्यांची जगभर ख्याती होती. ते धार्मिक व परंपरागत विचारसरणीचे होते आणि वृत्तीने अत्यंत कणखर होते. ते स्वतःला एक सामान्य शेतकरी व काँग्रेसचा एक नम्र सैनिक म्हणत. शेतकऱ्यांत स्वाभिमान निर्माण झाला, यात आपण कृतार्थ झालो असे ते मानीत. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि तत्काळ कृती यांवर त्यांचा भर असे. जवाहरलाल नेहरूंचा सामाजवादी आदर्शवाद त्यांना मान्य नव्हता. ते पूर्णतः वास्तववादी होते. त्यांचे व नेहरूंचे अनेक तात्त्विक मतभेद होते; पण महात्मा गांधी या दुव्यामुळे ते एकच काम करीत. शिवाय दोघांना व्यक्तिगत मतभेदांपेक्षा देशाचे कल्याण व भवितव्य श्रेष्ठ वाटे. देशाच्या फाळणीमागील द्विराष्ट्रवाद त्यांना अमान्य होता. मुसलमानांनी भारतीयांमध्ये एकरूप व्हावे, असे त्यांना वाटे. पण तत्कालीन परिस्थितीच्या दबावाखाली व गांधींमुळे त्यांनी ती योजना नेहरूंबरोबर मान्य केली. स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्ठी घडवून आणणारी  चाणाक्ष बुद्धी, कठोर शिस्त व परिस्थितीचे विलक्षण आकलन हे राजकारणी मुत्सद्याला आवश्यक असणारे गुण त्यांच्यात होते. कोणत्याही प्रश्नाकडे ते फलप्रमाण्यवादी दृष्टिकोनातून पाहत. म्हणूनच त्यांना श्रद्धाजली वाहताना द टाइम्सने (लंडन) त्यांचा गौरव बिस्मार्कपेक्षा श्रेष्ठ राजकरणपटू म्हणून केला आहे.
संदर्भ :
1. Das, Durga, Ed. Sardar Patel’s Correspondence, 10 Vols., Ahmedabad, 1971-74.
2. Panjabi, K. L. The Indomitable Sardar, Bombay, 1962.
3. Parikh, N. D. Sardar Vallabhbhai Patel, 2 Vols., Ahmedabad, 1953-56.
 4. Patel, P. U. Sardar Patel : India’s Man of Destiny. Bombay. 1964. 

                              

संपला नाहीये रणसंग्राम

सांगितला होता ज्यांनी
लक्ष्मीदर्शनाचा मुहूर्त
ज्यांनी आधीच दिले सल्ले
खाण्या-पिण्याचे आणि ठेऊन घेण्याचे
त्यांची कड घेतली नाही
म्हणून केली जिवंत जाळपोळ
तेच घेताहेत आज शपथा
जनतेचे वाली म्हणून
लोकशाहीचा उत्सव झाला
घरोघरी लक्ष्मी आली
निकाल तर लागून गेले
पण खरी परीक्षा आता सुरु झाली
संपला नाहीये रणसंग्राम
इतक्यात नका उसंत घेऊ,
सरकारच्या कारभारावर
सजगपणे लक्ष ठेऊ....


गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४

सापडलेच नाहीत साईबाबा...

शिर्डीच्या समाधीमंदिरात
सापडलेच नाहीत साईबाबा,
गाड्या आणि गर्दीने भरलेल्या रस्त्यातून
कशीबशी वाट काढत पोहोचले
क्लोकरुमपाशी आणि
चपलांपासून पिशव्यांपर्यंत
सारे पैसे भरूनही
त्यांनी काढून दिला
माझा मोबाईल माझ्या पिशवीतून
आणि जमा करवला एका वेगळ्या काउंटरवर
वेगळे पैसे घेऊन...
दर्शनाच्या रांगेत उभी राहिले,
चढले,
उतरले,
चालले,
धावले,
एका हॉलमधून दुसऱ्या हॉलमधे...
असे अनेक हॉल पार करत
अखेर पोहोचले
समाधीस्थानाच्या प्रवेशद्वाराशी
तिथल्या उर्मट सुरक्षारक्षकाने
जवळजवळ ढकललंच मला
दर्शनाच्या रांगेत...
माझे डोळे तर दिपुनच गेले
सोन्याचा गाभारा पाहून
मनात आलं
कोण असावेत हे अज्ञात भक्त
ज्यांना शक्य झाला एवढा देवधर्म...
असो,
काळ्याचं पांढरं करावं लागतंच कुठेतरी...
बाबांच्या समाधीपाशी उंचच उंच काचा
आणि त्यावर उभे पुजारी भक्तांनी आणलेलं
पूजासाहित्य समाधीवर झुलवून फेकताना
पुन्हा एकदा
तिथल्या उर्मट सुरक्षारक्षकाने
जवळजवळ ढकललंच मला
मागे येऊन मी पाहिलं पुन्हा पुन्हा
पण दिसलेच नाहीत मला तिथे साईबाबा...
म्हटलं, बाबा बसले असतील द्वारकामाईत
किंवा मग लेंडीबागेत
तर तिथेही नाहीत,
आता बाबांचा शोध घेतलाच पाहिजे,
वाट चुकले असतील बिचारे इथल्या गर्दीत,
म्हणून समाधीमंदिरातून बाहेर पडले,
लहानपणापासून पाहत आले मी
समाधीमंदिराच्या आवारात
पेरू विकणाऱ्या बायका,
म्हटलं त्यांना विचारावं,
मारुतीच्या मंदिरापाशी आले
तर तिथे एकही पेरूवाली नाही.
आश्चर्यच वाटलं मला.
तितक्यात तिथल्या आलिशान शॉपिंग सेंटरबाहेर
मला दिसली एक पेरुवाली
जीव मुठीत घेऊन पळताना,
मी धरला तिचा हात
तर म्हणाली
“सोडा बाई, ट्रस्टवालं आलं तर पाटी
फेकून देत्याल माझी.
आता गरिबासाठी जागा न्हाय इथं.”
मी काही बोलण्याआधीच पळून गेली बिचारी.
मंदिराच्या आवारात नाहीच कुणी कफल्लक
सारेच गडगंज श्रीमंत सुटाबुटात,
आणि त्यातल्या कुणालाच येत नव्हतं मराठी
आता कुणाला विचारावं?
मला वाटलं, बिच्चारे बाबा
त्यांच्या दारातल्या हरवलेल्या
सामान्य भक्तांना शोधायला बाहेर पडले असावेत.
आणि आता पुन्हा समाधीमंदिरात जायचं म्हणजे
अपरिहार्य असणारी त्रासदायक पायपीट,
पण बाबांचे एवढे सधन भक्त आहेत,
दानधर्म करतात म्हणजे बाबांच्या झोळीत
असतीलच किमान ५०० रुपये व्हीआयपी पाससाठी,
म्हणून धक्काबुक्की करत गेले पास काउंटरवर,
रांगेत उभ्या लोकांनी घातल्या असतील मला शिव्या
पण त्या कळल्याच नाही मला,
न जाणो कुठल्या भाषा होत्या त्या...
काउंटरवरच्या माणसाला विचारलं मी
“ इथे बाबा आले होते का?”
“ कौन बाबा?”
“ साईबाबा”
“ अहो बाई, साईबाबा तर गेले १९१८ला, ही तर समाधी आहे”
गडगडाटी हसत त्याने पाहिलं माझ्याकडे.
“ अहो बाई, कुठे शोधून राहिला बाबा, घरी जावा.
 कोन हाय रं तिकडं? बाईला बाहेर काढा.”
एकाने मला दंडाला धरून बाहेर काढलं..
विमनस्क मनाने मी चालू लागले क्लोकरूमकडे
अखेर शिर्डीच्या समाधीमंदिरात
सापडलेच नाहीत साईबाबा...



रविवार, १९ ऑक्टोबर, २०१४

आजच्या सत्तापरिवर्तनाच्या दिवशी भ्रष्टाचारवाद्यांचे
भीबिषण होणार तर...

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०१४

पोतराज



मी पाहिला भरदुपारी
आठ-दहा वर्षांचा पोतराज
अंगावर कोरडे ओढून घेताना,

आणि जमलेली गर्दी
त्याने हात पसरल्यावर

लगबगीने पांगताना...

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

कवी बनवलं मला

मी हसले, त्यांनी रडवलं,
मी प्रेम दिलं, त्यांनी छळलं,
मी आलिंगनासाठी बाहू पसरले,
त्यांनी बाह्यांना पकडून दूर सारलं,

माझी सारी जवळची माणसं,
मित्रपरिवार, शिक्षकवृंद,
साऱ्यांना आयुष्यात सारं काही मिळो
शेवटी त्यांनीच तर मला

जबरदस्तीने कवी बनवलं....

एकटेपणा

चालता चालता रस्त्यात
अचानक सहजच
उगीच हसू येतं,

लोकं मला वेडी समजत असतील
ही जाणीव होते,
मग आणखी हसू येतं..


आत्महत्या

मरायचंय मला कुणालाही न सांगता
ओठांच्या कोपऱ्यातून ओघळलं पाहिजे
दोन थेंब रक्त...

जे मला ओळखत नसतील ते म्हणतील,
“ही नक्कीच कुणाच्या तरी प्रेमात पडली असणार."
आणि जे मला ओळखत असतील ते म्हणतील,
“बरं झालं. खूप सहन केलं बिचारीने.”

पण खरं खरं कारण
यापैकी काहीच नसेल...


खिडकी

सगळ्यात चांगल्या असतात त्या खिडक्या
किमान आकाशात स्वच्छंद विहरणाऱ्या पक्ष्यांना
पाहू शकता तुम्ही चौफेर उभ्या भिंतींऐवजी.......

मरणारी माणसं

मी पाहतेय
मरताना लोकांना
त्यांच्या जिवंतपणीच,
मला दिसतं त्याचं
आतल्याआत कुढणं
स्वतःशी झगडणं,
मनातल्या भावना
मनात कोंडून
मन मारून जगणं...
व्हायला हवं
त्यांनी संघटीत
द्यायला हवा लढा,
करावा संघर्ष
स्वतःसाठी
येणाऱ्या पिढ्यांसाठी...
मी होते अस्वस्थ
मला वाईटही वाटतं
त्यांच्यासाठी,
आणि तीच लोकं
नाकारत राहतात
त्याचं मृतवत् जगणं...
कळत नाही मला
ही क्षणाक्षणाला
मरणारी माणसं
फक्त मलाच दिसतात

की....  ???

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४

दादोबा पांडुरंग तर्खडकर : पुण्यतिथीनिमित्त



दादोबा पांडुरंग तर्खडकर,
(९ मे १८१४१७ ऑक्टोबर १८८२).
अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक असणारे दादोबा पांडुरंग तर्खडकरयांचा मुंबई येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते.

संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी  (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. तीतून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. ह्या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्‌मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्र  (१९४७, संपा. अ. का. प्रियोळकर) महत्त्वाचे आहे. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ठ्ये. यांशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक  (१८३६), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६०), धर्मविवेचन  (१८६८), पारमहंसिक ब्राह्मधर्म  (१८८०) आणि शिशुबोध  (१८८४) अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला विधवाश्रुमार्जनहा संस्कृत निबंध बाबा पदमनजी ह्यांच्या यमुनापर्यटन  ह्या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता. विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग ह्याच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्‌स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग (१८७८) ह्या ग्रंथाची यूरोपात प्रशंसा झाली होती. दादोबांच्या साहित्यात साधेपणा आणि विचारप्रवर्तकता आहे. त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य अग्रेसर महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने मराठी भाषेचे पाणिनीहे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.

ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा (सु. १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे.

भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड त्यांनी १८५७ साली मोडून काढले व सरकारने रावबहादुर ही पदवी त्यांना बहाल केली. मुंबई येथे ते निधन पावले.


                                                          

माझं मत...

माझं मत लोकशाहीला
स्वातंत्र्याला
माझं मत
देशासाठी
माझ्या अभिव्यक्तीसाठी
माझं मत
तटस्थ आणि परखड मत
विकास संथ गतीने झाला तरी चालेल

पण लोकशाही टिकली पाहिजे...

लोकशाही...



डोळ्यांना बांधून झापडं
मतदार गातो विकासाची गाणी,
स्वातंत्र्य आलंय संपत
संपत आलीये आणीबाणी...
देश झालाय प्राथमिक शाळा
शिक्षक तोच मुख्याध्यापक,
नव्या स्वप्नांत तरंगताना
विचार नाही राहिले व्यापक...
रिमोटची बटणं दाबली जातील
राज्यांच्या वाहिन्या बदलतील,
चमचमणाऱ्या जाहिरनाम्यांचे
शब्दही तेव्हा खदखदतील...
हीच बनेल व्यवस्था
घालू श्राद्ध लोकशाहीचं,
आठवेल मग इटलीचा बेनीटो
राज्य त्याचं हुकुमशाहीचं...
दाबला जाईल प्रत्येक आवाज
विरोधासाठी उठलेला,
लोकशाही असेल वटवृक्ष
वीज पडून वठलेला...
येईलही आर्थिक संपन्नता
पण गमावून बसू अधिकार,
मनातल्या मनात वाटेल मग
महागात पडला मताधिकार...
काहीच नाही उरणार हाती
वाचून पहा इतिहास जरा,
सत्ता राहीली जर एकहाती
अभिव्यक्तीचाही आटेल झरा...
केलं आता साऱ्यांनी मतदान
लावून घेतली बोटावर शाई,
पण विसरू नका विकासापेक्षा
जगात मोठी असते लोकशाही...