ब्रह्मांडाचा नाका आजकाल
सुनसुना,
कुणाचीच काही धावपळ नाही,
search engineच्या जगात
सगळं काही सोप्प झालंय नाही का?
सगळं काही सोप्प झालंय नाही का?
आता जुने शब्द घेऊन
नव्या अर्थांच्या शोधात
भटकावं नाही लागत.
नव्या अर्थांच्या शोधात
भटकावं नाही लागत.
इथे प्रत्येक clickसरशी
जुन्या अर्थांचे अनेक नवे शब्द तयारच असतात.
जुन्या अर्थांचे अनेक नवे शब्द तयारच असतात.
दळणवळणही आता किती सुसह्य झालंय,
सुसह्यच कशाला आता तर प्रवासच उरला नाहीये
अनुभवापासून अनुभूतीपर्यंतचा...
आजकाल सारं काही operate होतं automatically ,
आणि सहज ठेवला जातो विश्वास
desktopच्या displayवर...
मनाची window close करून आपण open करतो internet,
आणि Copy pastच्या तंत्राने होत
राहते नवनिर्मिती...
Like आणि shareने लाडावलेले निर्मिक जेव्हा देत असतात
जुन्या अर्थांना नवा
जन्म,
नेमका त्याचवेळी,
कुणी अनामिक वेडा,
नव्या अर्थांचा
आर्ततेने शोध घेत
उभा असतो
ब्रह्मांडाच्या
नाक्यावर....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा