कोटी जन्म पुण्य
साधन साधिले । तेणे हाता आले हरिदास्य ॥१॥
रात्रीं दिवस
ध्यान हरीचे भजन । काया वाचा मन भगवंती ॥ध्रु॥
ऐसिया प्रेमळा
म्हणताती वेडा । संसार रोकडा बुडविला ॥२॥
रात्रीं दिवस
ध्यान हरीचे भजन । काया वाचा मन भगवंती ॥ध्रु॥
एकवीस कुळे जेणे
उद्धरिली । हे तो न कळे खोली भाग्यमंदा ॥३॥
रात्रीं दिवस
ध्यान हरीचे भजन । काया वाचा मन भगवंती ॥ध्रु॥
तुका म्हणे
त्याची पायधुळी मिळे । भवभय पळे वंदिताची ॥४॥
रात्रीं दिवस
ध्यान हरीचे भजन । काया वाचा मन भगवंती ॥ध्रु॥
४३५० पृष्ठ
७१०(शासकीय)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा