आम्ही हरिचे
सवंगडे । जुने ठायीचे वेडे बागडे ।
हाती धरुनी कडे ।
पाठीसवे वागविलो ॥१॥
म्हणोनि भिन्न
भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही ।
एका एक वेगळे ॥धृ॥
निद्रा करिता
होतो पायी । सवे चि लंका घेतली तई ।
वानरे गोवळ गाई ।
सवे चारित फिरतसो ॥२॥
म्हणोनि भिन्न
भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही ।
एका एक वेगळे ॥धृ॥
आम्हा नामाचे
चिंतन । राम कृष्ण नारायण।
तुका म्हणे क्षण
। खाता जेविता न विसंभो ॥३॥
म्हणोनि भिन्न
भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही ।
एका एक वेगळे ॥धृ॥
२२१७ पृ ३७२
(शिरवळकर), २३०१ पृ ३९२(शासकीय)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा