मागे बहुता जन्मी
। हे चि करित आलो आम्ही ।
भवतापश्रमी ।
दुःखे पीडिली निववू त्या ॥१॥
गर्जो हरिचे
पवाडे । मिळो वैष्णव बागडे ।
पाझर रोकडे ।
काढू पाषाणामध्ये ॥धृ॥
भाव शुध्द
नामावळी । हर्षे नाचो पिटू टाळी ।
घालू पाया तळी ।
कळिकाळ त्याबळे ॥२॥
गर्जो हरिचे
पवाडे । मिळो वैष्णव बागडे ।
पाझर रोकडे ।
काढू पाषाणामध्ये ॥धृ॥
कामक्रोध बंदखाणी
।तुका म्हणे दिले दोन्ही ।
इंद्रियांचे धनी
। आम्ही जालो गोसावी ॥३॥
गर्जो हरिचे
पवाडे । मिळो वैष्णव बागडे ।
पाझर रोकडे ।
काढू पाषाणामध्ये ॥धृ॥
३१७८ पृष्ठ
५८८(देहूकर सांप्रदायिक),२३०२ पृष्ठ ३९३(शासकीय)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा