चला रे वैष्णव हो जाऊ पंढरियेसी प्रेमामृतखुण
मागो त्या विठ्ठलासी ||1||
चालिले गोपाळ वाती वांकुलुया | भरले
प्रेमरसे मग ते वाजविती टाळिया ||2||
दिंड्या गरूडटके मृदंगाचे नाद | गाताती
विठ्ठलनाम करिताती अल्हाद ||3||
पाले पंढरी भीमा देखियली दृष्ठी | वैष्णवाचा
गजरू आनंदे हेलावली सृष्टी ||4||
गजरू गोपाळांचा श्रवणी पडियेला | शंखचक्र
करी विठ्ठल सामोरा आला ||5||
कासवदृष्ठी न्याहाळी रंगी नाचतु पै उगला |
सोपान
म्हणे आम्ही वाळवंटी केला काला ||6||
दुजेपणी ठाव द्वैत ते फेडिले | अद्वैत
बिंबले तेजोमय ||
तेजाकार दिशा बिंबी बिंब एक | निवृत्तीने
चोख दाखविले ||
निमाली वासना बुडाली भावना | गेली
ते कल्पना ठाव नाही ||
सोपान नैश्वर परब्रम्ह साचार | सेवितु
अपार नामघोषे ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा