नको गुंतु लटिक्या प्रपंचासी बापा | मार्ग
आहे सोपा पंढरीचा ||
न लगो पुसावे आटाआटी कांही | आणिके
प्रवाही गुन्तू नको ||
भांबावल्यापरि जन झाले मूढ | विसरले
दृढ विठोबासी ||
म्हणे जनार्दन एकनाथा निके | साधी
तू कौतुके हेची वर्म ||
देह शुद्ध करून भजनी भजावे | आणिकाये
नाठवावे दोषगुण ||
साधने समाधि नको पा उपाधी | सर्व
समबुद्धी करी मन ||
म्हणे जनार्दन घेई अनुताप | सांडी
पां संकल्प एकनाथा ||
आणिक या सूष्ठीं साधन पैं नाही | घेई
पा लवलाही नाम वाचे ||
उभा दिगंबर कटी ठेवूनि कर | शोभतसे
तीर चंद्रभागा ||
पुंडलिके निज साधिले साधन | ते
तू हऋदयी जाण धरी भावे ||
म्हणे जनार्दन एकनाथा ह्रदयी | विठ्ठलमंत्र
ध्यायी सर्वकाळ ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा