कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई
माझी ||
लसूण मिरची कोथिंबिरी | अवघा झाला माझा
हरी ||
मोट नाडा विहीर दोरी | अवघी व्यापिली
पंढरी ||
सावता म्हणे केला मळा | विठ्ठलपायी
गोविला गळा ||
नामचिया बळे न भीऊ सर्वथा | कळिकाळाच्या
माथा सोटे मारू ||
वैंकुठीचा देव आणू या किर्तनी | विठ्ठल
गाऊनी नाचो रंगी ||
सुखाचा सोहळा करूनि दिवाळी | प्रेमे
वनमाळी चित्ती धरू ||
सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा | तेणे
मुक्ति द्वारा वोळंगती ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा