जनासी तारक विठ्ठलचि एक | केलासे
विवेक सनकादिकी ||1||
ते रूप वोळले पंढरीस देखा | द्वैताची
पै शाखा तोडियेली ||2||
उगवते बिंव अद्वैत स्वयंभ | नाम
हे सुलभ विठ्ठलराज ||3||
निवत्तीचे गूज विठ्ठल सहज | गयनीराजे
मज सांगितले ||4||
आदिनाथ उमाबीज प्रगटले | मच्छिंद्रा
लाधले सहजस्थिती ||1||
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दीधली | पूर्ण
कृपा केली गयनीनाथा ||2||
वैराग्ये तापला सप्रेमे निवाला | ठेवा
जो लाधला शांतिसुखा ||3||
निर्द्वद्व नि:शंक विचरता मही | सुखानंद
हऋदयी स्थिर जाला ||4||
विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख | देऊनि
सम्यत अनन्यता ||5||
निवृत्ती गयनी कृपा केली पूर्ण | कुळ
पावन कृष्णनामे ||6||
भवसागरसार तरणोपाय सोपा | कृष्णनामे
खेपा हरिली जना ||1||
रामकृष्णमंत्र जनांसी उद्धार | आणिक
साचार मार्ग नाही ||2||
निवृत्तीधारणा गुरूचरण जाणा | बह्मांड
खुणा गुरूकृपा ||3||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा