शाकुंतलाचं एक पान
माझ्या कपाटातून निघून
वाऱ्यावर तरंगत आहे
तरंगत आहे कि उठावं
आणि आजूबाजूला पसरलेल्या
वस्तूंच्या कानात
सांगावं ‘नाही’
एक दृढ
आणि छोटंस नाही
जे साऱ्या आवाजांच्या
विरुद्ध
माझ्या उरात सुरक्षित आहे.
मी उठतो
दारापर्यंत जातो
शहराकडे पाहतो
हलवतो हात
आणि जोरात ओरडतो
नाही नाही नाही
मी अस्वस्थ आहे
मी किती वर्ष गमावली
रुळावरून चालत
आणि जगाला म्हणत
हो, हो, हो...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा