पण जेव्हा त्याला पाहतो
पाहवत नाही...
आजही उभा आहे तो
माझ्या दाराशी माझी वाट
पाहत
मोठ्या मोठ्या पंखांचा
खोलीतला दानव
फुलं कधी उमलतात
सण कधी येतात
अचानक वातावरण केव्हा बदलतं
त्याला सर्व माहित आहे.
म्हणून कधी काही विचारत
नाही
जेव्हा मी बाहेरून येतो
गुपचूप आपले क्षत-विक्षत
पंख उचलून
मला जागा देतो.
जणू तो सांगतो :
‘आता खूप थकलायस तू,
वीर योद्ध्या विश्राम कर.’
संध्याकाळच्या धुंदीत
उठणारे माझे हात
बांधले जातात.
कधी कधी त्याच्या खोल
निळ्या डोळ्यांतून
करुणा बरसते
आणि मला वाटतं
याच्याशी काय लढायचं?
आणि कधी असंही होतं
परतताना वाटेत
निश्चय करतो
आज जाऊन त्याला आव्हान देईन
लढेन
पराभूत करेन
त्याचे काळे काळे पंख छाटून
टाकेन
पण जेव्हा परततो
त्याला पाहतो त्याचप्रकारे
माझी वाट पाहत दारात उभा तो
खोलीतला दानव
अनिमिष, उदास.
माझ्या हातातून निसटतो
संकल्प
घाबरत नाही
पण जेव्हा त्याला पाहतो
गुपचूप, अनिमिष, उदास
पाहवत नाही...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा