नव्या दिवसासोबत
एक कोरं पान उघडलं
आपल्या प्रेमाचं
सकाळी,
यावर कुठेतरी आपलं नाव तरी
लिहून जा...
अनेक अपशकुनी पानांमध्ये
यालाही कुठेतरी ठेवून देईन
आणि जेव्हा जेव्हा वारा
येऊन
उडवेल अचानक बंद पानांना
कुठेतरी आत
मोरपिसाप्रमाणे ठेवलेलं ते
नाव
वाचेन प्रत्येकवेळी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा