जेवढे जळ
ओंजळीत उचलु शकतो
तुझ्यापासून
माझ्यासाठी तू तितकीच आहेस.
त्यातूनच भागवतो मी माझी
तहान
त्यातूनच आपल्या आत
उगवणाऱ्या सूर्याला
अर्घ्य अर्पण करतो.
आणि प्रत्येक वेळी रिती
ओंजळ
डोळ्यांना आणि मस्तकाला
लावून
अनुभव करतो
मी तुला
माझ्या आत
वाहताना पाहतो..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा