तुझे
नि माझे नाते काय ?
तू
देणारी मी घेणारा,
मी घेणारी तू देणारा
कधी
न कळते, रूप बदलते, चक्राचे आवर्तन घडते
अपुल्या
मधले फरक कोणते अन् अपुल्यातून समान काय ?
सुखदु:खाची
होता वृष्टी, कधी हसलो कधी झालो कष्टी
सायासाविण
सहजचि घडते, समेस येता टाळी पडते
कुठल्या
जन्मांची लय जुळते,
या मात्रांचे गणित काय ?
नात्याला
या नकोच नाव, दोघांचाही एकच गाव
वेगवेगळे
प्रवास तरीही, समान दोघांमधले काही
ठेच
लागते एकाला का रक्ताळे दुसर्याचा पाय ?
संदीप
खरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा