शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

ह्रदयस्पर्शी

गोष्ट साधीच आहे.
बायकोच्या आग्रहावरून लाडाकोडानं वाढवलेला एकुलता एक मुलगा आपल्या बापाला वृद्धाश्रमात सोडायला घेऊन जातो. हा अनाथश्रम कम वृद्धाश्रम एक सेवाभावी वृद्ध मालक अनेक वर्षे चालवत असतो. मुलगा तिथल्या सोयींबद्दल चौकशी करत असतो. सून तोपर्यंत सासर्याला सणावाराला सुद्धा घरी यायची काहीही गरज नाहिये हे पटवून सांगत असते. मुलगा वडिलाना विचारतो "तुम्हाला एसी, टिव्ही असलेली रुम घेऊया का?" वडिल म्हणतात "नको बेटा काही गरज नाही मला साधीच रुम चालेल". मुलगा फॉर्म भरण्यात व्यग्र असतो. तोपर्यंत आश्रमाचा मालक आणि वडिलांच्या जुन्या गप्पा चालू होतात. अगदी फार जुनी ओळख असल्यासारखे ते बोलत बसलेले असतात. ते पाहून मुलगा विचारतो "तुमची दोघांची आधीपासून ओळख आहे का?" वडिल काहीच बोलत नाहीत. ते पाहून अश्रमाचे मालक म्हणतात "हो रे आमची ३० वर्षे जुनी ओळख आहे" मुलगा आश्चर्याने म्हणतो "कशी काय?" अश्रमाचे मालक म्हणतात "अरे तीस वर्षापूर्वी त्यानी आमच्या इथूनच एक अनाथ मुलगा दत्तक घेतला होता!!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा