शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

संत मुक्ताबाई



अवघाचि संसार केला आम्ही गोड | झाडे आणि झूड ब्रह्मरूप ||
माता आणि पिता गण आणि गोत | कन्या आणि सुत ब्रम्हरूप ||
वापी कूप सिंधू आणि सरोवर | दरे आणि खोरे ब्रह्मरूप ||
हत्ती आणि घोडे, बैल आणि रेडे | मुंगी आणि माकुडे ब्रह्मरूप ||
आनंदाचे लेणे मुक्ताबाई ल्याली | पालवू लागली चांगयासी ||

योगी पावन मनाचा | साही अपराध जनाचा ||
विश्व रागे झाले वन्ही | संते सुखे व्हावे पाणी ||
शब्दशास्त्रे झाले क्लेश | संती मानावा उपदेश ||
विश्वपट ब्रह्मदोरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||

शुद्ध ज्याचा भाव झाला | दुरी नाही देव त्याला ||
अवघी साधनहातवटी | मोले मिळत नाही हाटी ||
कोण कोणा शिकवावे | सार साधुनिया घ्यावे ||
लडिवाळ मुक्ताबाई | जीव मृदल ठायीचे ठायी ||
तुम्ही तरूनि विश्व तारा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा