शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

संत जनाबाई




विठो माझा लेकुरवाळा | संगे गोपाळांचा मेळा ||
निवृत्ति हा खांद्यावरी | सोपानाचा हात धरी ||
पुढे चाले ज्ञानेश्‍वर | मागे मुक्ताई सुंदर ||
गोरा कुंभार मांडीवरी || चोखा जीवा बरोबरी ||
बंका कडियेवरी | नामा करांगुळी धरी ||
जनी म्हणे गोपाळा | करी भक्तांचा सोहळा ||

येग येग विठाबाई | माझे पंढरीचे आई ||
भीमा आणि चंद्रभागा | तुझ्या चरणीच्या गंगा ||
इतुक्यासहित त्वा बा यावे | माझी रंगणी नाचावे ||
माझा रंग तुझे गुणी | म्हणे नामयाची जनी ||

ज्याचा सखा हरी | त्यावरी विश्व कृपा करी ||
उणे पडो नेदी त्याचे | वारे सोसी आघातांचे ||
तयावीण क्षणभरी | कदा आपण नव्हे दुरी ||
आंगी आपुले वाढोनी | त्याला राखे जो निर्वाणी ||
ऐसा अंकित भक्तासी | म्हणे नामयाची दासी ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा