शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०१५

जनरीत

दिवस सुंदर, रजनी सुंदर,
अंतर सुंदर, सुंदराचे...

सुंदरच नाही, जगतात काही,
अंतरही नाही, माणसास...

जिव्हा करी वार, वाही व्यर्थ भार,
अहंकार सार, वर्तमानी...

जग चाले असे, काय सांगू कसे,
हित मनी वसे, जनांचिया... 

जशी होते तशीच.

परततेय पुन्हा माझ्यातच
मी जशी होते तशीच.
मन मोठ्ठ करून महान होण्याच्या
निष्फळ प्रयत्नांत
आता अडकायचंच नाहीये मला
हवीये पुन्हा तीच
उद्दाम वाणी
आधी जशी होती तशीच.



कोलंबसाचे गर्वगीत


क्षणिक




सर्वात्मका शिवसुंदरा


जार पेटवण्यासाठी


उपचार


वडिलधाऱ्या या पायांना


स्वार






समिधाच सख्या या


जैसी पुष्पामाजी पुष्प मोगरी ।
कि परिमळामाजि कस्तुरी ।।
तैसी भाषांमाजि कस्तुरी साजिरी ।
मराठीया ।।
मराठी राजभाषादिनाचा मराठमोळ्या शुभेच्छा...

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०१५

तुला विसरण्यासाठी

तुला विसरण्यासाठी
पट सोंगट्या खेळते;
अकांताने घेता दान
पटालाही घेरी येते!

असे कसे एकाएकी
फासे जळले मुठीत
कशा तुझ्या आठवणी
उभ्या कट्टीत.. कट्टीत!

दिला उधळुन डाव
आणि निघाले कुठेही
जिथे तुझे असें…
तुजे असे कांही नाही!

द्रुष्टी ठेविली समोर,
चालले मी ’कुठेही’त;
कुठेही च्या टोकापाशी
उभी मात्र तुझी मुर्त!

वाट टाकली मोडुन
आणि गाठला मी डोह;
एक तोच कनवाळु
माझे जाणिल ह्रुदय!

नांव तुझे येण्याआधी
दिला झोकुन मी तोल;
डोह लागला मिटाया
तुझी होऊन ओंजळ!!

– इंदिरा संत

आला केशराचा वारा

प्रभातीच्या केशराची कुणि उधळली
रास
आणि वाऱ्यावर
रंगला असा केशरी उल्हास!
रंगा गंधाने माखून झाला सुखद
शितळ
आणि ठुमकत चालला शीळ घालीत
मंजुळ!
हेलावत्या तळ्यावर
वारा केशराचा आला
लाटा -लहरी तरंगानी उचंबळुन
झेलला!
नीळे आभाळ क्षणात तळ्यामधे उतरले!
एकाएकी स्तब्ध झाले!!
नऊ सुर्याची मुद्रीका सीतामाईने
टाकली
इथे काय प्रकटली!
तळ्याकाठी माझे घर , उभी दारात
रहाते
हेलावत्या केशरात स्वप्ने सुंदर पहाते
केशराचे मंज माझा मनावर चमकले!
आली किरणे तळ्याशी दारातुन आत
आले
मनातील बिंदु बिंदि निगुतीने
गोळा केले
तळ्यावरच्य़ा शेल्यात घट्ट गाठीने
बांधले
– निराकार, इंदिरा संत

तिचे स्वप्न

तिचे स्वप्न दहा जणींसारखे
चविष्ट भरल्या ताटाचे. दोन
वेळच्या बेतांचे.
इस्त्रीच्या कपड्य़ांचे.
सजलेल्या घराचे.
कधी नाटक, कधी मैफिलीचे–
शेवटच्या रांगेचे.
थट्टामस्करीचे . गप्पा गोष्टींचे.
तिचे स्वप्न दहा जणींसारखें.
पण ते पडण्यापुर्वीच तिला जाग
आली
आणि मग कधी झोप लागलीच
नाही.
– इंदिरा संत