तुझी साद ऐसी पडे आज कानी,
तुझे तेच येणे मनाच्या
महाली,
तुझी तिच याद उरे चित्तात
ऐसी
तुझी प्रितवेडी तुझी राधिका
मी...
उरे एक उणे माझ्या
जीवनात,
तुझा हात नाही
माझ्या हातात,
तुझ्या ओठी नाही नाव
माझे अजुनी
तुझ्या नाही सख्या
मी अजुनी मनात...
तुझी साथ ऐसी भावनांची
गुंफण,
तुझ्या सोबती क्षण जणू
साठवण,
तुझा तू स्वतंत्र मी शापित
मात्र
परि तूच तू माझ्या मनी
आठवण...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा