गुरुवार, ३० जुलै, २०१५

तुकोबांच्या बालकथा 1

एक प्रेमगुज ऐके जगजेठी ।
आठवली गोष्टी सांगतसे ॥१॥

एक मृग दोन्ही पाडसांसहित ।
आनंदे चरत होती वनी ॥२॥

अवचिता तेथे पारधी पावला ।
घेऊनिया आला श्वाने दोन्ही ॥३॥

एकीकडे त्याणे चिरिल्या वाघुरा ।
ठेविले श्वानपुत्रा एकीकडे ॥४॥

एकीकडे तेणे वोणवा लाविला ।
आपण राहिला एकीकडे ॥५॥

चहूंकडोनिया मृगे वेढियेली ।
स्मरो ते लागली नाम तुझे ॥६॥

रामा कृष्णा हरी गोविंदा केशवा ।
देवाचिया देवा पावे आता ॥७॥

कोण रक्षी आता ऐसिये संकटी ।
बापा जगजेठी तुजविण ॥८॥

आइकोनि तुम्ही तयांची वचने ।
कृपा अंतःकरणे कळवळिला ॥९॥

आज्ञा तये काळी केली पर्जन्यासी ।
वेगी पावकासी विझवावे ॥१०॥

ससे एक तेथे उठवुनी पळविले ।
तया पाठी गेली श्वाने दोन्ही ॥११॥

मृगे चमकोनी सत्वर चालली ।
गोविंदे रक्षिली म्हणोनिया ॥१२॥

ऐसा तू कृपाळु दयाळु आहेसी ।
आपुल्या भक्तांसी जीवलग ॥१३॥

ऐसी तुझी कीर्ती जीवी आवडती ।
रखुमाईच्या पती तुका म्हणे ॥१४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा