तू दिलेले दान मी
स्वीकारले कोठे?
एवढेही मी मनाला मारले कोठे?
एवढेही मी मनाला मारले कोठे?
ही तयारी स्वागताची
कोणती आहे?
या स्मशानाला तुम्ही श्रृंगारले कोठे?
या स्मशानाला तुम्ही श्रृंगारले कोठे?
नेमका माझाच त्यांना
राग का आला?
मी कुणाचे नावही उच्चारले कोठे?
मी कुणाचे नावही उच्चारले कोठे?
एवढी गोडी तुझ्या
ओठांत का आली?
गोड का बोले कुणाशी कारले कोठे?
गोड का बोले कुणाशी कारले कोठे?
ही पहाटेची बरी नाही
तुझी घाई...
चांदणे बाजूस हे मी सारले कोठे?
चांदणे बाजूस हे मी सारले कोठे?
मी कधी जाहीर केली
आसवे माझी ?
दुःख हे माझेच मी गोंजारले कोठे?
दुःख हे माझेच मी गोंजारले कोठे?
मी जरी काही तुझ्याशी
बोललो नाही,
आपुले संबंध मी नाकारले कोठे?
आपुले संबंध मी नाकारले कोठे?
हा मला आता नको पाऊस
प्रेमाचा
मोडके आयुष्य मी शाकारले कोठे?
मोडके आयुष्य मी शाकारले कोठे?
'ईश्वरी इच्छा'च होती
कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?
माणसांनी माणसांना मारले कोठे?
सुरेश भट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा