सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

कोकण – बदलते संदर्भ



कोकण, माझं कोकण, तुमचं कोकण, समृध्द कोकण
खरं सांगायचं तर आपली ओळख विसरलेले कोकण             ...१

कौलारू घर, घरापुढे अंगण, संपत चालली ही परंपरा
बंगल्यांतल्या एसीमध्ये कोंडू लागलाय स्वच्छंद वारा ...२

घरापुढंच वृंदावन गेलं, आता आम्ही बोन्साय ठेवतो
शुभंकरोती ऐवजी आता टीव्हीचाच आवाज गुंजतो             ...३

गेली ती पान सुपारी, पडवी गेली, झोपाळे गेले
तिरक्या रिपीच्या खिडकीतून डोकावणेही गेले        ...४

गवताने शाकारलेले गोठे संपत चाललेत हळूहळू
गोठ्यामधली गुरंही रस्त्यावर लागलीयेत फिरू                 ...५

गायरान झालं सरकारजमा, वनराईसुद्धा संपली
ओसाड रानावरली जुनी देवस्थानं तेवढी वाचली     ...६

पारंपारिक ढोल ताशे गेले, डीजे नी डॉल्बी आले
बारा वाड्यांचे देव आता देवळापुरतेच राहिले                   ...७

क्षेत्रपाळाची घुंगुरकाठी आता अंधश्रद्धा ठरली
वाडवडिलांचे देवाचार आणि पुण्याईही सरली        ...८

डांबरी रस्ते जिथे तिथे, कोबा आला घरापुढती
लाल मातीची वर्णनं राहिली फक्त कवितेपुरती                  ...९

शास्त्री जगबुडी वशिष्ठी नकाशावर राहिल्या
हिरव्यागार तवंगाखाली पूर्णपणे गुदमरल्या            ...१०

उधाण समुद्र अजूनही टिकून आहे पश्चिमेकडे
साऱ्या शहराची घाण रीचवतोय निमुटपणे                      ...११

काळ बदलला तसं कोकणही बदलत गेलं
काळजाच्या शहाळ्यातलं पाणीही आटलं               ...१२

आंबा फणसाने लदलेला, सह्याद्रीने वेढलेला
असा हा कोकण प्रांत परशुरामाने निर्मिलेला                     ...१३

आजही आमचे कोकण आमचा अभिमान आहे
मनामनात जपलेला आमचा स्वाभिमान आहे           ...१४



आम्ही कोकणस्थ....

अल्लड उधाण वारा
बेफिकीर वाहणारा
सह्याद्रीच्या कुशीत
खुशाल फेर धरणारा
लाटांवर लाटा धावत येणाऱ्या
किनाऱ्याला जादूची झप्पी देणाऱ्या
कौलारू घरांपुढे तुळशी वृंदावन
त्यावरले राधागोविंद
अन् त्यांपुढे लावलेले निरंजन
नारळी पोफळीच्या बागा
अन् आंबा काजूची गर्द वनराई
मंदिराच्या पवित्र्यात मुग्ध देवराई
खळाळणारे पऱ्हे
आणि संथ वाहत्या नद्या
डोलणारी भातशेती
आणि फुलांनी वाकलेली कण्हेरी
रात्री घुंगुरकाठी घेऊन घेऊन
गावप्रदक्षिणा करणारा क्षेत्रपाळ
वेशीवरले महापुरुष आणि ग्रामदेवता
असंख्य मान्यमान्यता आणि परंपरा
आणि त्यातूनच आजवर जपलेली ओळख
आम्ही कोकणस्थ
अन् आता मात्र पोखरले जाताहेत सह्याद्रीचे कडे
नदीकिनाऱ्याचे काळीज खरवडून
केलं जातंय रेती उत्खनन
साऱ्या पऱ्ह्यांवर हिरवे थर साचलेले
आणि तरीही प्रस्तावित होतो इथे
नव्याने केमिकल झोन
परप्रांतीयांच्या पर्सिनेटमध्ये गोवली जाते
आमची सागरसृष्टी
आणि स्थानिक मासेमार मात्र परततो
रिकाम्या जाळ्याने आपल्या बायकामुलांच्या
आशेने उजळलेल्या चेहऱ्यांसमोर
निराश मनाने
सागरकिनारी सळसळणारी सुरुबने कापून
तिथे उभे राहत आहेत कॉटेज
पर्यटकांच्या विसाव्यासाठी
आणि त्यावरली वटवाघुळे झाली आहेत बेघर
इथे बड्या बड्या कंपन्यांना करात सूट मिळते
पण होत नाही आंबा उत्पादकांची कर्जमाफी
दरवर्षी विदर्भ-मराठवाडा मिळवत राहतो नवनवे पकेज
आणि अतिवृष्टी, पाणीटंचाई, बेरोजगारी, महागाई,
या आणि अशा अनंत अडचणींवर मात करत
आत्महत्या न करता झुंझत, झगडत आणि जिंकत राहतो
आम्ही कोकणस्थ....


बेगड



सकाळचे साडेआठ वाजत आले होते, पण अजूनही पहाटेचं धुकं डोंगरावरून सरलं नव्हतं. त्या धुक्यातून आपला काळा धूर सोडत नागमोडी वळणांनी कोकणची राणी रेल्वे स्थानकात दाखल झाली. तो काही पर्यटनाचा काळ नव्हता किंवा ते काही कोरेचे महत्त्वाचे स्थानकही नव्हते मात्र तरीही गावातल्या असंख्य लोकांची प्रचंड गर्दी तिथे दिसत होती. कोंकण रेल्वे साठी सर्व प्रकारचे सहाय्य करणाऱ्या, आपली जमीन स्वेच्छेने देणाऱ्या लोकांची कृतज्ञता म्हणून अवघ्या तीन गाड्या त्या स्थानकावर थांबत. त्यातील बहुतेक ती एक गाडी असावी. गर्दीतून वाट काढत मी बाहेर आले. रिक्षा पकडली आणि थेट बसस्थानक गाठलं. बस ही मिळाली. कधी नव्हे ती अगदी वेळेवर.

बस मधून उतरले आणि परत रिक्षा पकडली. मनात आलं, जिल्ह्याच्या कुठल्या कोपऱ्यात ठेवलंय हे साहित्य संमेलन. पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला, आयोजकांचा हा निर्णय अत्यंत योग्य आहे. त्यानिमित्ताने तरी ग्रामीण भागातील लोकांना चार चांगले साहित्यिक ऐकायला मिळतील. स्थानिक कवी आणि लेखकांना व्यासपीठ मिळेल. मनात आयोजकांबद्दल अपार आदर घेऊन मी संमेलनाच्या ठिकाणी उतरले. फुलांनी सजवलेले प्रवेशद्वार, सभोवताली रांगोळ्या आणि तितक्याच उत्साहाने धावपळ करणारी शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची फौज पाहून मन उल्हासित झालं होत. मी काव्यसंमेलनासाठी निमंत्रित होते. विद्यार्थी माझ्याही सह्या घेत होते सुरुवात तर छान झाली होती. पाहता पाहता रंगमंच सजला, सभागृह पाहुणे आणि प्रेक्षकांनी भरले आणि दिमाखदार सोहळ्याने उद्घाटन झाले. मान्यवर अध्यक्षांचे भाषणही छान झाले. ‘साहित्यिकांचे साहित्य हे बहुराष्ट्रीय कंपन्यांत गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या उच्चशिक्षित महिलांसाठी नव्हे तर खेड्यापाड्यातील श्रमिक, कष्टकरी, अल्पशिक्षित स्त्रियांसाठी असले पाहिजे.’ अध्यक्ष बाई खरंच खूप छान बोलल्या आणि उपस्थित मान्यवरांनीही त्यांचीच री ओढली. भरगच्च कार्यक्रमांनी रेलचेल असणारा पहिला दिवस छान चालला होता. निमंत्रितांची चांगली सरबराई होत होती. दुपारी सुर्यनारायण आग ओकत असताना निमंत्रितांना थंड पाणी मिळत होते, कुलरचा वारा मिळत होता, आयोजकांच्या पै-पाहुण्यांनी सभागृह गच्च भरलं होतं. आणि मोठमोठ्या साहित्यिकांची आणि तथाकथित सेलिब्रेटींची एक झलक मिळवण्यासाठी कपाळावरचा घाम पालथ्या मनगटाने पुसत तासनतास उभ्या असणाऱ्या बिनचेहऱ्याच्या साहित्यप्रेमींना पाहतच मनाला विलक्षण अस्वस्थता देत पहिला दिवस संपला

तीन दिवसीय संमेलनाच्या दुसऱ्याच दिवशी पहिल्या सत्राच्या ठरलेल्या वेळेच्या आधीच  मी पोहोचले माझ्याही आधी पोहोचली होती तिथल्या स्थानिक शाळांतील स्वयंसेवक विद्यार्थी मंडळी अन् धावतपळत आलेल्या महिलांची नाश्ता बनवण्याची लगबग सुरु होती. तोच आदल्या दिवशी श्रमिक महिलांचा कैवार घेणाऱ्या मंचावरील मान्यवर बाई हजर झाल्या.

“हे काय अजून नाश्ता नाही झालेला? वेळ काय झाली? हे कसलं नियोजन? या बायकांना लौकर यायला का झालं होतं? आता आम्ही निमंत्रित असूनही साधा नाश्ता आम्हाला मिळू नये वेळेवर? काय चाललंय हे? “

बाई संतापल्या होत्या.

“बाई, तुमचं बरोबर आहे. मात्र या बायका लांबवरच्या गावांतून येतात. त्यांना त्यांच्याही घरचं आवरून यायचं असतं. त्यांना जरा सांभाळून घ्या. नाश्ता आत्ता होईल तयार. सारी तयारी झाली आहे.”

नियोजन समितीच्या सदस्यांनी सारवासारव केली.

“सांभाळून घ्या म्हणजे काय? त्यांच्या समस्यांशी आम्हाला काय घेणं देणं? आम्ही पैसे मोजणार आहोत त्यासाठी. त्यांना झेपत नसेल तर करू नये त्यांनी काम. यांचे पैसेच कापून घ्या त्याशिवाय यांना अद्दल घडणार नाही.”

बाई चांगल्याच संतापल्या होत्या.

नाश्त्यावरचं मन उडून गेल्यावर मी थेट सभागृहात येऊन बसले. काही केल्या डोक्यातून आदल्या दिवशीचं अध्यक्षीय भाषणच जाईच ना. अन् डोळ्यादेखत घडलेला प्रसंग डोक्यातील विचारचक्र अधिकच गतिमान करीत होता. फुल स्पीड गाडीला करकचून ब्रेक दाबावा तसं हे विचारचक्र एकाएकी थांबलं. बाई आता कृतीप्रवण झाल्या होत्या. माझे कान आपोआप टवकारले गेले.

“नागपूर मधल्या एका मुलीवर अत्याचार झालाय. तिच्यासह तिच्या शाळेतील विद्यार्थीही उपोषणाला बसले आहेत. साहित्यिक म्हणून आपली जबाबदारी आहे. आपण या अशा कृत्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे. आपलं ते आद्य कर्तव्य आहे. एका महिलेवर अन्याय होत असताना आपण असं शांत राहणं मुळीच योग्य नाही. या साहित्य संमेलनांचे मंच हे समाजातल्या अशा कुप्रवृत्तींचा निषेध करण्यासाठीच असले पाहिजेत. चला सुज्ञ साहित्यिकांनो, चला. आपण या साऱ्या कृत्याचा जाहीर निषेध करूया.”

आता बाई पोटतिडकीने सर्वांना आवाहन करीत होत्या. त्यांच्या आवाहनाने अनेक निमंत्रित साहित्यिक पेटून उठले. त्यांच्या समर्थनात त्यांच्या मागून चालू लागले. बाई आता नागपूरला निघाल्यात की काय या शंकेने मीही त्या कळपात सामील झाले. पाहते तर काय टीव्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी आले होते. अन् आपल्या वाहिनीला ब्रेकिंग न्युजची स्ट्रीप चिकटवायला ते बाईंची बाईट घेत होते. बाईट संपली कळपातली गर्दी पांगली आणि बाई आपल्या  मूळ मुद्द्यावर आल्या. नियोजन समितीच्या सदस्यांना बोलावणे झाले आणि जेवण बनवणाऱ्या बायकांचे किती पैसे कापले जाणार याची विचारणा सुरु झाली.

माझा कार्यक्रम दुपारच्या सत्रात होता. मात्र मी लागलीच सभागृहातून काढता पाय घेतला. एव्हाना रांगोळ्या फिक्या पडल्या होत्या. फुलांच्या सजावटीतला जिवंतपणा निघून गेला होता. आणि मन विषण्ण झालं होतं. माझ्या लेखी या काही मिनिटांच्या घटनाक्रमातच त्या साहित्य संमेलनाचे, साहित्यिक चळवळीचे आणि तथाकथित साहित्यिकांच्या जीवनवादाचे सूप वाजले होते.

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

कलाम की कलमसे

१)अपनी पहली सफलता के बाद आराम मत करो ,क्योंकि अगर तुम अब असफल हो गए तो लोगों को यह कहने का मौका मिलेगा कि तुम्हारी  पहली सफलता बस भाग्य के कारण थी |
२ )दुनियाँ के बेहतरीन दिमाग क्लास की आखिरी बेंच पर भी पाए जा सकते हैं |
३ ) अपने काम से प्यार करो कंपनी से नहीं ,क्या पता कब तुम्हारी कंपनी तुम्हे प्यार करना बंद कर दे |
४ )सपने वो नहीं जो आप सोते हुए देखते हैं बल्कि सपने वो हैं जिनके लिए आप सोना छोड़ दे |
५ )सब चिड़ियाँ बारिश में आश्रय ढूंढती हैं पर ईगल नहीं क्योंकि वो बादलों से ऊपर उड़ने लगती है | समस्याएं वहीँ हैं केवल आप का रवैया सारा अंतर उतपन्न  करता है |
६ )शिखर पर पहुचने के लिए शक्ति की जरूरत होती है |चाहे वो पर्वत का शिखर हो या कैरियर का |
७ )काला रंग निराशा का प्रतीक है पर इसी काले रंग का ब्लैक बोर्ड कितने विद्यार्थियों के जीवन में उजाला लाता है |
८ )कठिनाइयां आप के जीवन में इसलिए नहीं आती कि वो आप को नष्ट करे बल्कि इस लिए आती हैं कि आप आप की छुपी हुई क्षमताएं व् शक्ति बाहर निकल कर आ सके और कठिनाइयों को दिखा सके कि आप उनसे ज्यादा कठिन हैं |
९ ) स्वप्न देखो ,क्योंकि स्वप्न विचारों में बदलते हैं और विचार क्रिया में |
१० )अगर आप अपने काम को सलाम करते हैं तो आप को किसी के आगे झुकने की जरूरत नहीं हैं | अगर आप अपने काम के साथ बेईमानी करते हैं तो आप को हर किसी को सलाम करना पड़ेगा |
११ )हम सब के पास बराबर प्रतिभा नहीं होती है पर हम सब के पास अपनी प्रतिभा को निखारने के बराबर अवसर होते हैं |
१२ )आत्मविश्वास और कठोर परिश्रम  ही वो दवाएं हैं जो असफलता नमक बीमारी को दूर करती हैं
१३ ) सफलता वो है जब हमारे दस्तखत औटोग्राफ में बदल जाए |
१४  )किसी को परस्त कर देना बहुत आसान है पर किसी को जीत लेना बहुत मुश्किल |
१५ )इंतज़ार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले पीछे छोड़ देते हैं |

कलाम यांचे विचार

माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची भाषणे नेहमीच प्रेरणादायी असत. त्यांच्या भाषणातील अनेक विचार चांगलेच लोकप्रिय झाले होते. यापैकी काही निवडक विचार.
* आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.
*देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.
* तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.
* जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.
* यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.
* यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.
* स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.
* एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.
* आपण आपल्या वर्तमानातील गोष्टींचा त्याग करून जेणेकरून आपल्या मुलांचं भविष्य उत्तम होईल.
*  स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.
*  संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.
*  य़शस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.

कलाम एक अविस्मरणीय पर्व

य: क्रियावान स पंडित:
जो क्रियाशील असतो तोच खरा पंडित असतो. डॉ. अब्दुल कलामांचे देशाच्या विकासात नेमके कोणते योगदान होते, हा विषय त्यांच्या निधनानंतर प्राधान्याने चर्चिला जातो आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या क्षेपणास्त्र निर्मिती कार्यक्रमापासून विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भरपूर बोलले जात आहे हे योग्यच आहे. पण, खरेतर त्यापेक्षाही राष्ट्रपती पदावर असतांना आणि प्राधान्याने त्यानंतर त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील अभूतपूर्व कार्याचे महत्त्व समजून घ्यायला हवे. शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठ यासारखी शैक्षणिक संस्था सुरू करणे, कोणत्यातरी देशी-विदेशी विद्यापीठात अतिथी प्राध्यापक म्हणून अध्यापन करणे, आपल्या अभ्यासविषयासंबंधी संशोधनपर ग्रंथ लेखन करणे, प्रयोगशाळेत प्रयोग करून नवनवीन शोध लावणे, किंवा शिक्षण विषयक मार्गदर्शन करणार्‍या एखाद्या आयोगावर कार्य करणे, यासारखे सद्यस्थितीत शेैैक्षणिक मानले जाणारे कार्य त्यांनी केले नाही. एखाद्या विद्यापीठापुरते एका विशिष्ट वयोगटातील व विशिष्ट बौद्धिक पातळी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट वेळापुरते आणि कमीतकमी शारीरिक त्रास होईल एवढेच अध्यापन करणे एवढीच शैक्षणिक कार्याची मर्यादा मानली नाही. उलट वय वाढत असताना, दूरदूरचा प्रवास करणे हे अत्यंत त्रासदायक होण्याची शक्यता असतानाही त्यांनी आसेतू हिमाचल एवढ्या विशाल प्रदेशातील सर्व शालेय आणि महाविद्यालयीन विद्यापीठातील विद्यार्थी हे आपले विद्यार्थी मानून सातत्याने केलेले प्रबोधनाचे कार्य हे केवळ अभूतपूर्व असे होते. या कार्याचे विविध वेधक पैलू होते.
डॉ. कलामांना शिक्षणव्यवस्थेतील विविध प्रकारच्या विषमतांची उत्तम जाण होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासाठी कोणत्याही सोयी न मिळणे आणि शहरी भागातीलही बहुतांश विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण न मिळणे, ही त्यांच्या दृष्टीने सर्वात जास्त चिंतेची बाब होती. युवक आणि लहान मुले यांची सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात बालकांना आणि युवकांना देशातील राज्यव्यवस्थेकडून व शैक्षणिक संस्थांकडून अत्यंत उपेक्षेची वागणूक मिळते. चांगले अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक असलेले उत्तम दर्जाचे शिक्षक व महत्त्वाच्या सर्व शैक्षणिक सोयीसुविधा या देशातील सर्व मुला-मुलींना आणि युवक-युवतींना मिळत नाहीत व ती कोणाला गंभीर बाबही वाटत नाही, हेही ते बघत होते. देशातील निवडक शालेय विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालये, आणि निवडक युवक-युवतींना आयआयएम किंवा आयआयटी सारख्या निवडक शिक्षण संस्थांमधे शिक्षण दिले जाते. तिथे ग्रंथालये, प्रयोगशाळा अशा सर्व उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सोयी असतात. अद्ययावत शैक्षणिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून, अध्यापन केले जाते. विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारण्यास प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याएवढी गुणवत्ता असलेले शिक्षक असतात. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशा स्पर्धा असतात. नामवंत विद्वानांशी, प्रेरणादायी व्यक्तींशी, कलाकारांशी, संशोधकांशी, संवाद साधण्याची संधी असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, त्यांचा आत्मविश्‍वास वाढावा यासाठी असंख्य उपक्रमांचे आयोजन केले जाते. शिक्षक विद्यार्थी यांच्यातील संवादाला भर देणार्‍या सहयोगी शिक्षण पद्धतीला महत्त्व दिलेले असते. या सोयी सवलतींचा दूरगामी सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर होतो. पण या अशा सर्व प्रकारच्या मूलभूत सोयी सवलतींना या देशातील लक्षावधी मुलामुलींना आणि युवक युवतींना वंचित राहावे लागते, याचा अनुभव डॉ. कलामांना आयुष्यभर आलेला होता. या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडविणे त्यांना अशक्य असले तरीही त्यांनी आपल्या सर्जनशीलतेनी काही अभिनव उपक्रम हाती घेतले व त्यातून एक वेगळीच वाट निवडली.
आपल्या देशातील विविध वयोगटातील लक्षावधी विद्यार्थ्यांशी ई-मेलव्दारे संवाद साधण्यास त्यांनी सुरुवात केली. या अभिनव पद्धतीमुळे कोणालाही त्यांच्याशी संपर्क करणे शक्य होऊ लागले. येणार्‍या हजारो ई-मेल वाचून जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तेव्हा विद्याथ्यार्र्ंच्या अक्षरश: हजारो प्रश्‍नांना ते उत्तरेही देऊ लागले. हे अभूतपूर्व होते. विद्यार्थ्यांना मूर्ख समजून त्यांना येता जाता कायम उपदेशाचे डोस पाजणे, भाषणबाजीतून मार्गदर्शन करणे, प्रश्‍नच विचारू न देणे, व कोणी प्रश्‍न विचारल्यास त्याचा पाणउतारा करणे, ज्या गोष्टी आपल्या जीवनात कधीच आचरणात आणल्या नाहीत त्या विद्यार्थ्यांनी आचरणात आणाव्या म्हणून अपेक्षा करणे, आणि विद्यार्थ्यांतून होता होईतो विचार न करणारी व मुकाटपणे आपल्या आज्ञा पाळणारी पिढीकिंवा संस्थेचा कार्यकर्ता घडविणे, आपण सांगतो तेच योग्य व आदर्श म्हणून वारंवार सांगणे, म्हणजेच युवकांशी संवाद करणे, असे आपल्या देशातील बहुतांश पालक, शिक्षक,ज्येष्ठ व्यक्ती मानतात. ही ज्येष्ठांची प्रचलित भूमिका पूर्णत: नाकारून डॉ. कलाम हे विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारण्यास, स्वतंत्र बुद्धीने विचार करण्यास, विचारांती जे योग्य वाटेल तेच स्वीकारण्यास प्रोत्साहन देऊ लागले. मार्गदर्शनाची, चांगल्या गोष्टी सांगण्याची पद्धतही त्यांनी बदलून टाकली. ज्या गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या त्या विद्यार्थ्यांनी कराव्या असे ते सांगू लागले. विविध क्षेत्रातील यशामुळे त्यांच्या सांगण्याचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडू लागला.
ई-मेल व्दारे जसा ते विद्यार्थ्यांशी अभिनव पद्धतीने संवाद साधत होते तसाच संवाद त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांमधील भाषणांतून, प्रश्‍नोत्तरांतून, आणि चर्चेतून सुरू ठेवला. फक्त उच्च दर्जाच्या, शहरातल्या व श्रीमंतांच्या शैक्षणिक संस्थांना मानधनाची अपेक्षा करीत भेट न देता, अक्षरश: सर्व प्रकारच्या व दर्जाच्या शैक्षणिक संस्थांच्या आमंत्रणाचा कोणतीही अपेक्षा न करता स्वीकार केला आणि त्या त्या संस्थांतील हजारो विद्यार्थ्यांशी नाळ जोडली. वर्षानुवर्षे अध्यापन क्षेत्रात राहूनही असंख्य शिक्षक व प्राध्यापक जो संवाद साधू शकले नव्हते, ते कार्य डॉ. कलाम आपल्या प्रत्येक संवादातून साध्य करू लागले. या कार्यक्रमांतून जगातील नामवंत विद्यापीठांमधे व शैक्षणिक संस्थांमधे प्रचलित असलेल्या संवादाधारित व स्वतंत्रपणे विचार करण्यास प्राधान्य देणार्‍या अध्यापन पद्धतीचा डॉ. कलामांनी हजारो विद्यार्थ्यांना जसा परिचय करून दिला, तसाच अल्प प्रमाणात का होईना लाभही करून दिला. या भेटीत ते भाषण देत, प्रश्‍न विचारत, प्रश्‍न विचारण्यास, विचार करण्यास समस्यांची उत्तरे शोधण्यास प्रोत्साहन देत. आपली संपूर्ण शिक्षणपद्धती ही माहितीकेंद्री झालेली आहे. विचार करण्यास त्यात अत्यल्प महत्त्व आहे. विचार करायला बाध्य करणार्‍या शिक्षकांचाही अभाव आहे. बहुतेक जण हे तयार नोट्‌स विद्यार्थ्यांना लिहून घेण्यास सांगणारे असतात. ते प्रश्‍न विचारण्यास प्रोत्साहन देत नाहीत कारण अनेकदा प्रश्‍नांची उत्तरे त्यांनाच माहीत नसतात. माहिती केंद्री अभ्यासामुळे व विचार करण्यास काहीच महत्त्व नसल्याने विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होत नाही. ते समस्यांची उत्तरे शोधू शकत नाहीत. समस्यांवर मात करणे मग अगदीच कठीण होते. विद्यार्थ्यांची प्रगती होणेच थांबते. देशातील हजारो विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे घडलेले आहे. अशा परिस्थितीत डॉ. कलामांनी त्यांना विचार करायला लावल्याने केवढा महत्त्वाचा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला हे लक्षात येईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉ. कलाम यांनी सातत्याने सर्व स्तरातील विद्यार्थ्यांमधील आत्मविश्‍वास जागविण्याचे कार्य केले. काही अपवाद वगळता आपल्या शैक्षणिक संस्थांतील शिक्षक प्राध्यापक हे विद्यार्थ्यांना काय येत नाही याची जास्त दखल घेतात. प्रत्येक विद्यार्थ्यात जन्मत:च एक किंवा अधिक प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात, हे न ओळखता त्याला जे येते त्याकडेही पूर्ण दुर्लक्ष करतात. अनेकदा तर शिक्षक, प्राध्यापकांना आपल्या विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखताच येत नाही. असे शिक्षक प्राध्यापक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी, केवळ गणित, विज्ञान आणि इंग्रजीसारखे विषय येत नाहीत म्हणून अगदी सहजगत्या त्यांचा पाणउतारा करताना दिसतात किंवा त्यांना कमीपणाची वागणूक देतात. वर्गात सर्वात मागे बसणारे विद्यार्थी तर शिक्षकांच्या दृष्टीने सर्वात निरुपयोगी असतात. ‘या आज वर्गात मागे बसणार्‍या विद्यार्थ्यांमधे भविष्यातील प्रतिभावान वैज्ञानिक, किंवा यशस्वी व्यक्ती असण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा’, हे डॉ. कलाम सांगत असत. त्यांचा हा संदेश केवळ मेरीटमधे आलेल्या व परीक्षांमधे खूप गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांनाच महत्त्व देणार्‍या हजारो शाळा व महाविद्यालयांच्या संचालकांना व शिक्षकांना खरेतर आत्मपरिक्षण करण्यास बाध्य करणारा होता. डॉ. कलाम आपल्या भाषणांतून कायम सर्व विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करण्यास व आत्मविश्‍वास जागविण्यास सांगत असत. त्यांनी आत्मविश्‍वास जागवण्याचे हे जे कार्य केले तेही असेच अभूतपूर्व होते. सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून कायम ज्यांना हिणवले गेले, अशा विद्यार्थ्यांना ते तुम्ही तुमचे आयुष्य घडवू शकता, तुम्हीही प्रयत्न केलेत तर यशस्वी होऊ शकता, असे सांगत असत. असा आत्मविश्‍वास जागवणार्‍या व्यक्तींची आज फारच गरज आहे. केवळ आत्मविश्‍वास नसल्याने असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी आज अपयशी होतांना दिसतात. म्हणूनच त्यांचे हे सांगणे शैक्षणिक क्षेत्रातील नकारात्मक वातावरणात सकारात्मक दृष्टिकोन देणारे, प्रेरणादायी असे होते. अशा प्रयत्नांची आजही नितांत गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे केवळ चांगल्या शिक्षणाच्या सोयी न मिळाल्याने मागे पडतात असे ते वारंवार सांगत असत. मात्र, त्याबरोबरच कोणतीही नकारात्मक परिस्थिती किंवा समस्या असल्या तरीही त्यांच्यावर विद्यार्थी आपल्या आत्मविश्‍वासाच्या बळावर मात करू शकतात हे ते सांगत होते. त्यांचे हे सांगणे त्यांच्या जीवनात त्यांनी सिद्ध करून दाखविले होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमधील आत्मविश्‍वास जागविण्याचे कार्य करणारे डॉ. कलाम हे एकमेव वैज्ञानिक ठरले.
डॉ. कलाम आपल्या भाषणांतून जे विषय मांडत होते तेही महत्त्वाचे होते. सहसा शालेय व अगदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोरही देशासमोरचे खरे प्रश्‍न नीट मांडलेच जात नाहीत. त्यामुळे उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमधेही देशासमोरील प्रश्‍नांबद्दल अज्ञानच असते, असे दिसून येते. शैक्षणिक संस्थांतूनही देशासमोरील समस्यांबद्दल विद्यार्थ्यांचे प्रबोधन होत नाही. अभ्यासक्रम शिकविणे आणि विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी तयारी करून घेणे, एवढेच काय ते महत्त्वाचे मानले जाते. डॉ. कलामांनी, मात्र याही बाबतीत वेगळा मार्ग चोखाळला. अगदी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि नामवंत शैक्षणिक संस्थांतील सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसमोरही ते न चुकता प्रदूषण, सामाजिक- आर्थिक विषमता, पर्यावरण संरक्षण, साक्षरता, गरिबी, दारिद्य्र, आर्थिक-सामाजिक मागासलेपण, बेरोजगारी, पाण्याचे दुर्भिक्ष, ग्रामीण भागातील समस्या, अशा असंख्य मुद्यांसंबंधी बोलत असत. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी काय काय करायला हवे हे ही ते आवर्जून सांगत. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न केले पाहिजेत व त्यासाठी कटिबद्ध होण्याचे ते आवाहन करीत असत. तशा आशयाची शपथही देत असत. देशासमोरील मूलभूत जीवनमरणाच्या समस्यांबद्दल हजारो शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचे व त्यांना हे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रेरित करण्याचे कार्य एवढया मोठया प्रमाणात करणारे डॉ. कलाम हे एकमेव होते.
आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत डॉ. कलाम हे नियमितपणे व सातत्याने लेखन करीत गेले. त्यांनी आपल्या अनुभवांवर आधारित अनेक पुस्तके लिहिली. ती वाचून असंख्य जणांना प्रेरणा मिळाली व यापुढेही प्रेरणा मिळत राहील. परिषदा, चर्चासत्रे, भाषणे, लेखन, चर्चा, प्रश्‍नोत्तरे, ई-मेल या माध्यमातून त्यांनी लक्षावधी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना प्रोत्साहन दिले, त्यांचा आत्मविश्‍वास जागवला, त्यांना प्रश्‍न विचारून किंवा प्रश्‍न विचारायला सांगून विचारप्रवृत्त केले. कोणत्याही वयोगटातील कोणाही विद्यार्थ्याला न घाबरता आपल्याशी सहजगत्या संवाद साधता यावा यासाठी प्रयत्न केले. आपले पद, प्रतिष्ठा, प्रदीर्घ अनुभव, ज्ञान यांचा बडेजाव न करता संवाद साधतांना कोणालाही दडपण येणार नाही याचीही काळजी घेतली. त्यासाठी हसतमुख राहून प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक प्रश्‍न, प्रत्येक मत महत्त्वाचे मानून ते शांतपणे ऐकून घेण्याचा नेहमी प्रयत्न केला. यामुळेच हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधणे त्यांना शक्य झाले. त्यांच्या साधेपणामुळे, विनम्र वृत्तीमुळे व प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाचा मानण्याच्या भूमिकेमुळे विद्यार्थीही त्यांच्याशी न घाबरता मनमोकळा संवाद साधू शकले. डॉ. कलाम हे या असंख्य विद्यार्थ्यांमधे ध्येयवाद, आत्मविश्‍वास, देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा रुजवू शकले. त्यांनी आयुष्यभर अत्यंत आवडीने सुरू ठेवलेल्या या संवादपर्वाची सांगताही संवाद साधतांनाच झाली ही भाग्याचीच गोष्ट मानायला हवी.
डॉ. कलामांनी आपला प्रत्येक क्षण, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष हे आपल्या ध्येयपूर्तीसाठी उपयोगात आणले. या देशातील युवा पिढीच्या प्रबोधनासाठी, बौद्धिक प्रगतीसाठी, विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत ते अत्यंत कृतिशील जीवन जगले. संवादाच्या माध्यमातून आपले कार्य सुरू ठेवले. विद्यार्थ्यांशी फक्त भाषणांव्दारेच नव्हे तर प्रश्‍नोत्तरे, चर्चा, यांच्याव्दारे संवाद साधण्याचे व देशासमोरील खर्‍या मूलभूत प्रश्‍नांबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचे त्यांचे कार्य या देशातील हजारो शिक्षक-प्राध्यापकांनी यापुढेही त्याच निष्ठेने सुरू ठेवणे हीच डॉ. कलामांना खरी श्रद्धांजली असेल.

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

कपालभाती



      कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो.
      कपालभातीने हार्टमधले ब्लोकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् 15 दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता. कपालभाती करणार्याची हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंशन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली 70 ते 80 टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात.
     कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझोल होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.
     कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतो.
     कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते. कपाभाती केल्याने हीमोग्लोबिन एका महिन्यात 12% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात 16 ते 18 पर्यन्त जाते. महिलांच् हीमोग्लोबिन 16 व् पुरुषांच्ं 18 असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.
     कपाभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एकामहिन्यात सामान्य होतात. हे पहात आलो आहे.
     कपाभातिमुळे थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते.  हे कपालभातीमुळे होते.
    एवढंच नाही तर, कपालभाती करणारा 5 मिनिटात मनाच्या पलीकडे जाता. गुड़ हार्मोन्स सीक्रेट होऊ लागतात. स्ट्रेस हामोंस गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही. किती विशेष आहे पहा.
     कपाभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात. कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला एक एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दूसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट आसण जसा आजार आहे तसं ओव्हरवेट आसण ही आजारच आहे.
      कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.
     कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.
       अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होण. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तूटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुल होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुल होतात व् त्याच रुगलाल स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विद्यानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.
     कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् 3 ते 9 महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात.
       लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज 10% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडुदेत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलि पाहिजे.
    विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत. एक महत्वाची गोष्ट की आजारी, रोगी यांनी प्राणायाम योग्य, अनुभवी गुरुकडूनच शिकले पाहिजेत. अन्यथा गड़बड़ होऊ शकते.
करा योग रहा निरोग