बखरीतील जुनी
नावे ...
महिकावतीची बखर ही १४ व्या ते १६ व्या शतकात लिहिली गेली असल्याने ह्यात
जुन्या मराठी शब्दांचा प्रचंड समावेश आहे. कै. राजवाडे यांनी बखरीमधल्या एकूण
शब्दांची संख्या मोजली ती सुमारे १२ हजार इतकी भरली. ह्यात १०३ यावनी उर्फ फारशी
शब्द आलेले आहेत असे त्यानी प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. १२ हजारात फक्त १०३ शब्द
म्हणजे मुसलमानी सत्ता येऊनही रोजच्या व्यवहारात डोईजड होईल इतकी ती कोकणात तरी
फैलावली नव्हती असेच म्हणावे लागेल. संपूर्ण बखरीमध्ये उत्तर कोकण म्हणजे मुंबई -
ठाणे आणि आसपास परिसरातील गावांची, किल्ल्यांची आणि
प्रांतांची एकूण ३९६ नावे आलेली आहेत. त्यातील महत्वाची आणि मोजकी ६० नावे पुढे
देत आहे. त्यांच्या जुन्या नावांपुढे सध्याची नावे कंसात दिलेली आहेत...
१. आगाशी (आगाशी-
विरार जवळ)
२. उतन (उत्तन -
भाईंदर जवळ)
३. कळवे (कळवा -
ठाणे शहर)
४. कान्हेरी
(बोरीवली)
५. कोंडीवटे
(कोंदिवडे - कर्जत - राजमाची पायथा)
६. आन्धेरी
(अंधेरी)
७. कानझुरे
(कांझूर - कांझूरमार्ग)
८. कालिणे
(कालिना - सांताक्रूझ)
९. कोपरी (कोपरी
- ठाणे पूर्व)
१०. कोलसेत
(कोलशेत - ठाणे - घोडबंदर)
११. उरण (उरण)
१२. आसनपे
(आसनगाव)
१३. कल्याण (कल्याण)
१४. कांधवळी
(कांदिवली)
१५. खरडी (खर्डी
- कसारा जवळ)
१६. घोडबंदर
(घोडबंदर ठाणे)
१७. चेउल (चौल -
अलिबाग)
१८. डिडोशी
(दिंडोशी)
१९. तांदूळवाडी
पैलदेची (तांदूळवाडी - पालघर जवळ)
२०. ताराघर
(तारापूर - पालघरजवळ)
२१. तुरफे
(तुर्भे)
२२. गोराई
(गोराई)
२३. चरई (चरई -
ठाणे पश्चिम)
२४. चेने (चेना -
ठाणे घोडबंदर)
२५. चेंभूर
(चेंबूर)
२६. जवार
(जव्हार)
२७. डोंगरी
(डोंगरी - मुंबई)
२८. दहीसापूर
(दहिसर?)
२९. गोरगाव
(गोरेगाव)
३०. चेंदणी
(चेंदणी - ठाणे खाडीकडील भाग)
३१. जुहू (जुहू)
३२. तळोजे महाल
(तळोजा - पनवेलजवळ)
३३. दांडाळे
(दांडाळेतळे वसई)
३४. नागावे
(नायगाव)
३५. बोरवली
(बोरीवली)
३६. भाईखळे
(भायखळा)
३७. महिकावती
(माहीम - पालघर)
३८. बिंबस्थान
(केळवे - पालघर)
३९. देवनरे
(देवनार)
४०. नाउर (नाहूर
- मुंबई)
४१. मणोर (मनोरी
- मुंबई)
४२. मागाठण
(मागाठणे - मुंबई)
४३. वरोळी (वरळी)
४४. वासी (वाशी)
४५. वाळुकेश्वर
(वाळकेश्वर)
४६. वेउर (येऊर -
ठाणे)
४७. वोवळे (ओवळे
- ओवळा - ठाणे घोडबंदर)
४८. वरसावे
(वर्सोवा)
४९. वांदरे
(बांद्रा - मुंबई)
५०. विह्रार
(विरार)
५१. माझिवडे
(माजिवडा - ठाणे घोडबंदर)
५२. काशीमिरे
(काशीमिरे - मीरारोड मधील)
५३. सीरगाव
(शिरगाव - पालघर)
५४. मुंबई
(मुंबई)
५५. मुळूद
(मुलुंड)
५६. सानपे
(सानपाडा?)
५७. साहार (सहार
- मुंबई विमानतळ भाग)
५८. सीव (शिव -
सायन)
५९. साष्टी (ठाणे
परिसर)
६०. सोपारे
(नालासोपारा)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा