सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५
बेगड
बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५
कलाम की कलमसे
२ )दुनियाँ के बेहतरीन दिमाग क्लास की आखिरी बेंच पर भी पाए जा सकते हैं |
३ ) अपने काम से प्यार करो कंपनी से नहीं ,क्या पता कब तुम्हारी कंपनी तुम्हे प्यार करना बंद कर दे |
४ )सपने वो नहीं जो आप सोते हुए देखते हैं बल्कि सपने वो हैं जिनके लिए आप सोना छोड़ दे |
५ )सब चिड़ियाँ बारिश में आश्रय ढूंढती हैं पर ईगल नहीं क्योंकि वो बादलों से ऊपर उड़ने लगती है | समस्याएं वहीँ हैं केवल आप का रवैया सारा अंतर उतपन्न करता है |
६ )शिखर पर पहुचने के लिए शक्ति की जरूरत होती है |चाहे वो पर्वत का शिखर हो या कैरियर का |
७ )काला रंग निराशा का प्रतीक है पर इसी काले रंग का ब्लैक बोर्ड कितने विद्यार्थियों के जीवन में उजाला लाता है |
८ )कठिनाइयां आप के जीवन में इसलिए नहीं आती कि वो आप को नष्ट करे बल्कि इस लिए आती हैं कि आप आप की छुपी हुई क्षमताएं व् शक्ति बाहर निकल कर आ सके और कठिनाइयों को दिखा सके कि आप उनसे ज्यादा कठिन हैं |
९ ) स्वप्न देखो ,क्योंकि स्वप्न विचारों में बदलते हैं और विचार क्रिया में |
१० )अगर आप अपने काम को सलाम करते हैं तो आप को किसी के आगे झुकने की जरूरत नहीं हैं | अगर आप अपने काम के साथ बेईमानी करते हैं तो आप को हर किसी को सलाम करना पड़ेगा |
११ )हम सब के पास बराबर प्रतिभा नहीं होती है पर हम सब के पास अपनी प्रतिभा को निखारने के बराबर अवसर होते हैं |
१२ )आत्मविश्वास और कठोर परिश्रम ही वो दवाएं हैं जो असफलता नमक बीमारी को दूर करती हैं
१३ ) सफलता वो है जब हमारे दस्तखत औटोग्राफ में बदल जाए |
१४ )किसी को परस्त कर देना बहुत आसान है पर किसी को जीत लेना बहुत मुश्किल |
१५ )इंतज़ार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले पीछे छोड़ देते हैं |
कलाम यांचे विचार
कलाम एक अविस्मरणीय पर्व
शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५
कपालभाती
कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो.
कपालभातीने हार्टमधले ब्लोकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् 15 दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता. कपालभाती करणार्याची हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंशन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली 70 ते 80 टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात.
कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझोल होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.
कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतो.
कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते. कपाभाती केल्याने हीमोग्लोबिन एका महिन्यात 12% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात 16 ते 18 पर्यन्त जाते. महिलांच् हीमोग्लोबिन 16 व् पुरुषांच्ं 18 असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.
कपाभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एकामहिन्यात सामान्य होतात. हे पहात आलो आहे.
कपाभातिमुळे थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते. हे कपालभातीमुळे होते.
एवढंच नाही तर, कपालभाती करणारा 5 मिनिटात मनाच्या पलीकडे जाता. गुड़ हार्मोन्स सीक्रेट होऊ लागतात. स्ट्रेस हामोंस गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही. किती विशेष आहे पहा.
कपाभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात. कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला एक एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दूसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट आसण जसा आजार आहे तसं ओव्हरवेट आसण ही आजारच आहे.
कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.
कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.
अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होण. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तूटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुल होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुल होतात व् त्याच रुगलाल स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विद्यानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.
कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् 3 ते 9 महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात.
लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज 10% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडुदेत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलि पाहिजे.
विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत. एक महत्वाची गोष्ट की आजारी, रोगी यांनी प्राणायाम योग्य, अनुभवी गुरुकडूनच शिकले पाहिजेत. अन्यथा गड़बड़ होऊ शकते.
करा योग रहा निरोग
ह्रदयस्पर्शी
गोष्ट साधीच आहे.
बायकोच्या आग्रहावरून लाडाकोडानं वाढवलेला एकुलता एक मुलगा आपल्या बापाला वृद्धाश्रमात सोडायला घेऊन जातो. हा अनाथश्रम कम वृद्धाश्रम एक सेवाभावी वृद्ध मालक अनेक वर्षे चालवत असतो. मुलगा तिथल्या सोयींबद्दल चौकशी करत असतो. सून तोपर्यंत सासर्याला सणावाराला सुद्धा घरी यायची काहीही गरज नाहिये हे पटवून सांगत असते. मुलगा वडिलाना विचारतो "तुम्हाला एसी, टिव्ही असलेली रुम घेऊया का?" वडिल म्हणतात "नको बेटा काही गरज नाही मला साधीच रुम चालेल". मुलगा फॉर्म भरण्यात व्यग्र असतो. तोपर्यंत आश्रमाचा मालक आणि वडिलांच्या जुन्या गप्पा चालू होतात. अगदी फार जुनी ओळख असल्यासारखे ते बोलत बसलेले असतात. ते पाहून मुलगा विचारतो "तुमची दोघांची आधीपासून ओळख आहे का?" वडिल काहीच बोलत नाहीत. ते पाहून अश्रमाचे मालक म्हणतात "हो रे आमची ३० वर्षे जुनी ओळख आहे" मुलगा आश्चर्याने म्हणतो "कशी काय?" अश्रमाचे मालक म्हणतात "अरे तीस वर्षापूर्वी त्यानी आमच्या इथूनच एक अनाथ मुलगा दत्तक घेतला होता!!"
"द्वीपशिखा"
पोर्टब्लेअरपासून अवघ्या ८-१० मिनिटांच्या अंतरावर 'रॉस' नावाचे बेट आहे. ब्रिटिश खलाशी डॅनिअल रॉसच्या नावावरुन या बेटाचे नाव ठेवलेय. ह्या बेटावर राहाते एक देवी! अनुराधा राव नाव तिचं. पण का तिची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला? काय एवढं विशेष आहेत तिच्यात? एकाच वाक्यात सांगायचं झालं तर, अंदमानातली सगळ्यात महत्त्वाची अगदी तिथल्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांच्याइतकी आणि सेल्युलरजेलइतकीच महत्त्वाची गोष्ट आहे ती! तुम्हाला खोटं वाटेल, पण माझ्या दौऱ्यात पहिल्या दिवशी त्यांची भेट होऊ शकली नाही तर तिसऱ्या दिवशी काही स्थळं पाहाणे रद्द केले मी, पण तिची भेट घेतलीच! यावरुनच तिच्या महत्तेची कल्पना यावी!!
अनुराधाचे वडील रॉस बेटावरचे रहिवासी. ते वारल्यावर निव्वळ कुतुहलापोटी अनुराधा ह्या बेटावर आली. अवघं ३ वर्षाचं वय होतं तिचं. बेटावर ससे होते, हरणं होती, मोर होते, बुलबुल होते. पण सर्वत्र अनागोंदी माजलेली. सरकारी खलाशी वाट्टेल तेव्हा शिकार करत असत. झाडं तोडत असत. कुणी सांसद-विधायक येणार असला की त्याच्यासाठी हरणं मारुन नेत असत. असं होता होता आख्ख्या बेटावर केवळ ८-१०च प्राणी उरलेले. तेही जखमी. आजारी. भुकेलेले. लहानगी अनुराधा हे सगळं पाहात होती. तिने एकदा थांबवायचा प्रयत्न केला. वाईट मारले खलाश्यांनी तिला. बास! त्यादिवसापासूनच अनुराधा कुणाशीही बोलेनाशी झाली. एक कोळी तिच्याबद्दल सहानुभूती बाळगून होता. लहानगं वय! उंची कमी!! त्या कोळ्याच्या खांद्यावर चढायची. झाडपाला तोडायची. आणि दिवसभर भटकून सगळ्या प्राण्यांना खाऊ घालायची. अगदी रोज! नित्यनेमाने!! खलाशी वेडी समजू लागले होते तिला. हीसुद्धा कुणी काही बोलले की दगड उगारुन मागे लागायची त्याच्या. तिच्या वेडेपणावर अजूनच शिक्कामोर्तब व्हायचे त्याने!!
हा क्रम १-२ नव्हे, तर तब्बल २० वर्षे चालला. २० खडतर वर्षे! ह्याकाळात ती शेकडो वेळा पडली. हजारो वेळा धडपडली. बेदम मार तर कितीदा खाल्ला ह्याची गणतीच नाही! काय मिळवलं तिने त्या २० वर्षांत? ज्या बेटावर अवघे ८-१० प्राणी उरले होते, तिथल्या प्राण्यांची संख्या हजारावर गेली. एकट्या अनुराधाच्या तपश्चर्येमुळे!! १९८७ साली रॉस बेट सैन्याच्या ताब्यात गेले आणि अनुराधाच्या आयुष्यातला दुस्वासाचा भीषण काळ संपला. सैन्याने नुसत्या तिच्या कल्पना ऐकल्याच नाहीत तर त्या प्रत्यक्षात उतरण्यासाठी सगळी मदतसुद्धा केली. तिच्यामुळे हे बेट टिकून राहिलंय. आज अनुराधाचे वय ५१ वर्षे आहे व ती तिथली अधिकृत स्थलदर्शी (गाईड) आहे. पण एवढ्यावरच तिची कहाणी संपत नाही.
आम्ही अनुराधाला भेटलो आणि ती बेटाची माहिती देऊ लागली. तेवढ्यात तिथे एक हरिण दिसले. त्याला पाहाताच अनुराधाने हाक मारली,
"ए राजूऽऽ इधर आ"!
आणि काय आश्चर्य, ते हरिण चक्क आम्हां माणसांच्या घोळक्यात येऊन उभे राहिले. अनुराधा त्याच्याशी गप्पा मारु लागली. जसजसे आम्ही पुढे जात गेलो, तसतसा आमचा समूह वाढत होता. हरणं आली, मोर आले, लांडोरी आल्या, ससे आले, तऱ्हेतऱ्हेचे पक्षी आले. अनुराधा सगळ्यांशी गप्पा मारत होती. त्या प्राण्यांपैकी एकेकाच्या सवयी आणि स्वभाव सांगत होती. अगदी जवळच्या मित्र-नातेवाईकांबद्दल बोलावं तस्सं! मग ती मध्येच एखाद्या लांडोरीला म्हणायची,
"रेश्मा, तेरा बच्चा तो बीमार था ना? किधर है, दिखा"?
आणि ती लांडोर ताबडतोब तिच्या पिल्लाला शोधून घेऊन आली.
"अरे, यह तो ज़ख़्मी है! जा उसे वह वाले पेड ते पत्ते चूसके लगा"!
आणि खरोखरच ती लांडोर पिल्लाला घेऊन त्या झाडापाशी गेली व उपचार करायला लागली! मग ती कधी सश्याशी बोलायची तर कधी हरणांशी. अचानक वरुन एक बुलबूल पक्ष्यांचा थवा उडत गेला. अनुराधाने पटकन हाक मारुन बोलावलं. त्याबरोब्बर ते शेकडो पक्षी खाली उतरले. तिने मोठ्ठ्याने ओरडून सांगितले,
"जाओ जाके बाकीके दोस्तोंकोभी बुलाके लाओ. बोलो, अम्मा बुला रही है!"
पटकन चार-दोन पक्षी उडाले आणि अजून शे-सव्वाशे दोस्तांना घेऊन आले. सगळे जमल्यावर अनुराधाने त्यांना सांगितलं की,
"अभी यह नये लोग है ना, इन्होंने कभी तुमको नज़दिकसे देखा नहीं. तो यह तुम्हारे फोटो-वोटो लेंगे. डरना नहीं हां!"
आणि काय आश्चर्य! सगळे प्राणी, पक्षी आम्हांला हात लावू देऊ लागले. फोटो काढू देऊ लागले!!
अशी अनुराधा. यांच्यापैकी कोणत्याही जीवाला तिने प्रशिक्षण दिलेले नाही. ती त्यांच्याचसोबत वाढलीये. हे सारं गणगोत आहे तिचं. त्यांना तिची भाषा समजते आणि तिला त्यांची! त्सुनामीने सगळंच्या सगळं कुटूंब हिरावून घेतल्यानंतर तर ह्या मंडळींशिवाय अनुराधाचं आपलं असं कुणीच राहिलं नाही. जे कुणी आहेत ते हेच आहेत. कित्येकदा त्यांना वाचवताना जीव धोक्यात घातलाय अनुराधाने. एक-दोन नव्हे, तर चक्क २५ वेगवेगळ्या शस्त्रक्रिया झाल्यायत तिच्यावर. तरीही तिच्या दिनचर्येत एक दिवसही खाडा झालेला नाही. मी तिला विचारलं,
"ऐसी खस्ता तबियतके बावजूद कैसे कर लेती है आप यह सब"?
तर म्हणाली, "वह जो उपर बैठा है ना, बहोत बडा झगडा चल रहा है मेरा उसके साथ! मैंने उसको बोल दिया है की, अगर यह जानवर ज़िंदा रखने है तो मुझे अपने पैरोंपे खडा रख. वरना बेशक़ मार दे मुझे. मेरा क्या है! कोई नहीं आगेपीछे रोनेवाला. मगर इन लोगोंका मेरे सिवा कोई नहीं. बस, तबसे भगवान मुझे मारता नहीं और इन जानवरोंका सहारा छिनता नहीं!"
मी पाया पडू लागलो तर पाय चटकन मागे घेतला आणि प्रेमाने माझ्या पाठित धपाटा घालून हसत-हसत म्हणाली,
"हट सुव्वर"!!
निघताना आमच्यातल्या एकाने पटकन पाचशेची नोट काढून दिली तिला. तिने ती घेतली आणि "थँक्यू" म्हणाली. कुणी काही कुणी काही रक्कम देऊ केली तिला तर घेईचना. म्हणाली,
"इतने ज़्यादा पैसे मैं नहीं ले सकती. पाँचसौ बस हो गए मेरे लिए".
ऐकेचना. शेवटी बळजबरी कोंबले पैसे तिच्या हातात. ती सांगत होती,
"टूरिस्ट लोगोंसे तो मैं कई-कई बार पैसे लेतीभी नहीं. हाँ, पर अगर कोई एम्पी-एमेले आए, तो छोडती नहीं सालेको. उससे मनमर्ज़ी पैसे वसूलती हूँ. क्यूँ छोडे? हरामी रोज़ लूटते है हमें. कहीं तो जेबें ढीली करना सीखो!"
तिच्या ह्या मार्मिक तत्त्वज्ञानाची गंमत वाटत होती. पण ते मनापासून पटतही होते! ती म्हणाली,
"पीछले महिने वह तुम्हारे ठाकरेका बच्चा आया था ना? वह आनेवाला था मुझसे मिलने! उसके पहलेही उसका पीए आ धमका मेरे पास. कहने लगा, सुना है तुम किसीभी मिनिस्टर और पॉलिटिशियनको जो मनमें आए बोल देती हो? हमारे साहबके सामने ऐसा मत करना हाँ! मैं बोली, क्यूँ ना करु? अगर वह कुछ ग़लत बोलेगा तो मैं उसे नहीं छोडूँगी! बादमें जब उसका साहब आया तो मैंने उससे पूछा, तेरा पीए ऐसा बोल रहा था. तो वह बत्तीस दाँत दिखाके हँसने लगा! बोला, नहीं अम्मा जो तुमको ठीक लगे नहीं बोलो. छोडा नहीं मैंने उसकोभी! अच्छा आदमी लगता है पर वह!"
भूतकाळातल्या कटू आठवणींमुळे अनुराधा सगळ्याच राजकारण्यांवर उखडून आहे. पण असं नाही की, ती नुसती फटकळच आहे. तिच्या मनात एका व्यक्तीविषयी अपरंपार भक्ती भरुन राहिलीये. महाराष्ट्राच्या जातीची ना गोताची अनुराधा आम्हांला सांगत होती -
"जब दुनियाका अंत होता है ना, तब नई संस्कृती पनपती है. वह लोग ज़मीं खोदते है तो पीछली सभ्यताके कुछ बर्तन मिलते है, मूर्तीयाँ मिलती है. उन्हींको वह भगवान समझके पूजने लगते है. जब हमारी संस्कृती खत्म हो जाएगी ना, तबभी आनेवाली नस्ल ऐसीही खुदाई करेगी. उस मिट्टीसे पता हा कौनसा भगवान निकलेगा? उस माटीसे निकलनेवाले भगवान होंगे, वीर विनायक दामोदर सावरकर..!"
माझ्याच्याने पुढचे ऐकवलेच गेले नाही. कानांवर तिचे शब्द पडत होते केवळ. मेंदू त्यांचा अर्थच लावायचा बंद झाला होता. डोळ्यांतून अश्रूंचा श्रावण बरसत होता. ती म्हणाली,
"..जब वह नस्ल सावरकरजीको भगवान मानना शुरु कर देगी, समझो बस तभीसे धरतीका स्वर्ग बनना शुुरु हो जाएगा!"
सावरकरांच्या स्वतःच्या राज्यात त्यांची जात पाहून द्वेष करणारे डुकरं राहात असताना अडिच-तीन हजार किलोमीटर लांबवर सावरकरांना देव मानणारी ही बाई आम्हाला त्यांचा महीमा सांगत होती. डोळ्यांतून झरणारे पाणी आणि त्यात सूर्याचा प्रखर प्रकाश, यांमुळे अस्पष्ट दिसणारी अनुराधा त्याक्षणी मानवी वाटतच नव्हती, मानव राहिलीच नव्हती. ती झाली होती "द्वीपशिखा"! चमचमणारी तेजोमयी द्वीपशिखा!! इथून पुढचे माझे अंदमानातले सारे व्याख्यानदौरे केवळ आणि केवळ ह्या द्वीपशिखेच्या दर्शनानेच पूर्ण होणार आहेत!!
— © विक्रम श्रीराम एडके
[सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या नावाशिवाय कॉपी-पे
स्ट करु नये. लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com]